याची देही याची डोळा सावर्डीच्या विद्यार्थ्यानी अनुभवला दिंडी सोहळा.

 याची देही याची डोळा सावर्डीच्या विद्यार्थ्यानी अनुभवला दिंडी सोहळा.

  --------------------------------------

शाहुवाडी तालुका प्रतिनिधी 

आनंदा तेलवणकर

मो .9404477703 

--------------------------------------

शाहुवाडी : सावर्डी  येथील जिल्हा परिषद प्राथमिक सावर्डी शाळेत आषाढी वारीनिमित्त दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. शाळेच्या विद्यार्थ्यांनी  वेशभूषा करून टाळ मृदुंगाच्या तालावर ठेका धरत मुखी हरीनाम गात दिंडीचा आनंद घेतला.या दिंडीमध्ये मुलींनी नऊवारी साडी तर  मुलांनी सदरा – धोतर परिधान केले होते.त्याचबरोबर सर्व विद्यार्थ्यांनी विठ्ठल नामाचे भजन म्हणत दिंडीला सुरवात केली.विद्यार्थीनिनी झिम्मा –फुगडीचा आनंद लुटला . या दिंडीत ग्रामस्थांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. या दिंडीचे आयोजन शाळेचे मुख्याध्यापक आनंदा काशिद यांनी केले.या दिंडीत विद्यार्थ्यांसह संजय पोवार,पुजा गुरव,पायल रवंदे, अश्विनी सावंत हे शिक्षक सहभागी झाले.

Comments

Popular posts from this blog

अनैतिक प्रेम संबंधातून शिवथर येथील विवाहित महिलेचा गळा कापून खून.

तुरंबे येथील तेरा वर्षाची युवती चे प्रेत विहिरी सापडले.

हिम्मत असेल तर राजेश पवाराणी भिलारेना बोट लावून दाखवावे _ माधव पाटील पवळे.