40,000 रुपयांची लाच घेताना महिला सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात.
40,000 रुपयांची लाच घेताना महिला सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात.
-------------------------------कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी
शशिकांत कुंभार
-------------------------------
अपघात प्रकरणी जप्त करण्यात आलेले वाहन सोडवण्यासाठी 60,000रपयाची मागणी करणार्या लोकसेवीका निता शिवाजी कांबळे या सहायक पोलीस उपनिरीक्षक गडहिंग्लज हिस पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये 40,000 रुपयांची लाच घेताना लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले.
या घटनेची अधिक माहिती अशी की,
तक्रारदार यांच्या मुलाच्या विरोधात गडहिंग्लज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता त्या गुन्ह्रामध्ये तक्रारदार याचे वहान जप्त करण्यात आले होते सदर वाहन सोडवण्यासाठी व गुन्ह्यात लावलेली कलमे कमी करण्यासाठी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक निता शिवाजी कांबळे यांनी तक्रारदार यांच्याकडे 60,000 रुपयांची मागणी केली होती तडजोडी नंतर 05/07/2025 रोजी 40,000 रुपयांची लाच घेताना लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले सदर लोकसेविका विरुद्ध गडहिंग्लज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
सदरची कारवाई शिरीष देशपांडे पोलीस अधीक्षक पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक वैष्णवी पाटील याच्या अधीपत्याखाली पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप पोलीस हवालदार संदीप काशीद, सुधीर पाटील पोलीस हेड कॉन्स्टेबल संगीता गावडे पोलीस कॉन्स्टेबल
कृष्णा पाटील संदीप पोवार यांनी केली.

No comments: