"ग्रामीण भागातील युवकांचा स्पर्धा परीक्षांकडे वाढता कल".
"ग्रामीण भागातील युवकांचा स्पर्धा परीक्षांकडे वाढता कल".
--------------------------
कुंभोज प्रतिनिधी
विनोद शिंगे
--------------------------
सध्या कुंभोज सह हातकणंगले तालुक्यातील ग्रामीण भागातील युवकांमध्ये स्पर्धा परीक्षांकडे झपाट्याने कल वाढताना दिसत आहे. सरकारी नोकरी मिळवण्यासाठी त्यांचा उत्साह आणि प्रयत्न उल्लेखनीय आहेत. शहरी भागाच्या तुलनेत मर्यादित साधनसंपत्ती असूनही, ग्रामीण युवक आत्मविश्वासाने अभ्यास करत आहेत आणि विविध स्पर्धा परीक्षांमध्ये आपले वर्चस्व निर्माण करत आहेत.
विशेषतः महाराष्ट्रातील मराठवाडा, विदर्भ, आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांतील विद्यार्थ्यांनी MPSC, UPSC, पोलीस भरती, तसेच बँकिंग व रेल्वे भरतीसारख्या स्पर्धा परीक्षांकडे वळणे सुरू केले आहे. इंटरनेट आणि मोबाइलच्या वाढत्या वापरामुळे माहितीची सहज उपलब्धता, ऑनलाईन कोचिंग क्लासेस, आणि डिजिटल शिक्षणाचे साधन यामुळे ग्रामीण विद्यार्थ्यांना नवीन दिशा मिळत आहे.
ग्रामीण भागातील शिक्षक, पालक आणि सामाजिक कार्यकर्त्यांचाही या प्रवासात मोठा वाटा आहे. कुंभोज येथे रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षा अभ्यासिका केंद्र ही सुरू करण्यात आले, तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाचनालय कुंभोजच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षेसाठी सहभाग घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत पुस्तकांचा पाठपुरावा केला जात आहे. आहे.काही स्वयंसेवी संस्था आणि स्थानिक अभ्यासिका मोफत मार्गदर्शन आणि वाचन साहित्य देऊन विद्यार्थ्यांना मदत करत आहेत.
ग्रामीण युवकांचा हा वाढता कल केवळ त्यांचं वैयक्तिक भविष्य उजळवणार नाही, तर देशाच्या प्रगतीसाठीही एक सकारात्मक पाऊल ठरणार आहे. शासन आणि समाजाच्या संयुक्त प्रयत्नांनी या युवकांना योग्य दिशा व संधी मिळाल्यास ते यशाच्या शिखरावर पोहोचू शकतात. परिणामी दररोज सकाळी व्यायामासाठी मोठ्या प्रमाणात बाहेर पडणारी युवक व युवती पाहता खऱ्या अर्थाने ग्रामीण भागात पुन्हा एकदा स्पर्धा परीक्षेची वेळ युवकांना लागल्याचे चित्र दिसत आहे.
Comments
Post a Comment