पुरामुळे जनजीवन विस्कळीत : पुराच्या पाण्यात अडकला टेंपो, अथक प्रयत्नानंतर नंतर बाहेर काढण्यास यश बुरंबाळ व काटे गावांचा संपर्क तुटला.
पुरामुळे जनजीवन विस्कळीत : पुराच्या पाण्यात अडकला टेंपो, अथक प्रयत्नानंतर नंतर बाहेर काढण्यास यश बुरंबाळ व काटे गावांचा संपर्क तुटला.
-----------------------------------
शाहुवाडी प्रतिनिधी
आनंदा तेलवणकर.
मो.9404477703
-----------------------------------
करंजफेण : कोकण आणि घाटमाथ्यावर सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून. कोल्हापूरहून पाचलकडे फरशी भरून जाणारा टेंपो (MH 08 AP 5139) कांटे-बर्की दरम्यान तोरण पट्टीच्या मोहरीवर पुराच्या पाण्यात अडकला.
श्री. महेश चंद्रकांत सुतार (रा. पाचल, ता. राजापूर) यांच्या मालकीचा हा टेंपो मोहरीवर पाणी आल्याने रस्त्याचा अंदाज न आल्यामुळे रस्त्याच्या कडेला असलेल्या गटारात जाऊन रात्री ११ वाजण्याच्या सुमारास फसला. . सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. सदर चा टेंम्पो दुपारी १ वाजण्याच्या सुमारास पाण्यातून बाहेर काढण्यात आला या साठी कांटे येथील पोलीस पाटील जगदीश पाटील , अजय कांबळे अविनाश कांबळे, महादेव साळोखे यांनी अथक परिश्रम घेऊन ट्रॅक्टरच्या सहाय्याने टेंम्पो बाहेर काढला
याशिवाय, या भागातील दूध संकलनही ठप्प झाले असून शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे.
Comments
Post a Comment