विद्यार्थ्यांनी अनुभवला लोकशाहीचा उत्सव दि न्यू इंग्लिश स्कूलमध्ये डिजिटल निकालाचा थरार.
विद्यार्थ्यांनी अनुभवला लोकशाहीचा उत्सव दि न्यू इंग्लिश स्कूलमध्ये डिजिटल निकालाचा थरार.
--------------------------------
चंदगड प्रतिनिधी
आशिष पाटील
--------------------------------
चंदगड : दि न्यू इंग्लिश स्कूल, चंदगड येथे शालेय मंत्रीमंडळ निवडणूक मोठ्या उत्साहात पार पडली. खेडूत शिक्षण मंडळाच्या मार्गदर्शनाखाली २०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठी ही निवडणूक गुप्त मतदान प्रणालीद्वारे घेण्यात आली. विशेष म्हणजे मतमोजणी डिजिटल पद्धतीने स्क्रीनवर करण्यात आली. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये निकाल पाहण्याची उत्सुकता आणि थरार द्विगुणित झाला.
डिजिटल बोर्डवर जाहीर झालेल्या निकालामुळे प्रत्येक मतानंतर निकालात होत असलेले बदल विद्यार्थ्यांसाठी नवीन अनुभव ठरले. निकाल समोर येताच शाळेचे प्राचार्य आर. पी. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नव्या मंत्रीमंडळाची प्रथम कॅबिनेट बैठक पार पडली. या बैठकीत विद्यार्थ्यांनी काही ठोस निर्णय घेत धडाकेबाज सुरुवात केली.
नवीन कॅबिनेट मंत्रीमंडळ याप्रमाणे:
मुख्यमंत्री: ओमकार हरिष जाधव
उपमुख्यमंत्री: प्रणय भैरू कांबळे
विद्यार्थिनी प्रतिनिधी: कु. सृष्टी शाहू गावडे
सांस्कृतिक मंत्री: तेजल संदीप गावडे
क्रीडा मंत्री: पृथ्वीराज संभाजी चव्हाण
सहल मंत्री: रोहन रवळनाथ कुंभार
राज्यमंत्री पदांवर निवड झालेली नावे:
शिस्त मंत्री – ओंकार विजय माळी
बाग मंत्री – रिया इकबाल मुजावर
प्रार्थना मंत्री – मंजिरी सदानंद शिंदे
हस्तलिखित मंत्री – आदिती अनिल सूर्यवंशी
आरोग्य मंत्री – समिता तुकाराम कडूकर
शापोआ मंत्री – संभव सागर कुंभार
पर्यावरण मंत्री – दक्ष संदीप नांगरे
या निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया प्राचार्य आर. पी. पाटील, निवडणूक निर्णय अधिकारी व्ही. के. गावडे आणि सहनिवडणूक अधिकारी टी. व्ही. खंदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उपप्राचार्य व्ही. एन. कांबळे, सांस्कृतिक विभाग प्रमुख संजय साबळे, जे. जी. पाटील, व्ही. एन. मोहनगेकर, आकाश चव्हाण, टी. बी. तरवाळ, ओंकार पाटील इत्यादी शिक्षकांनी विशेष मेहनत घेतली.
Comments
Post a Comment