जुन्या पेन्शन साठी राधानगरी तालुक्यातून शेकडो शिक्षक कर्मचारी मुबईला जाणार.
जुन्या पेन्शन साठी राधानगरी तालुक्यातून शेकडो शिक्षक कर्मचारी मुबईला जाणार.
--------------------------------
राधानगरी प्रतिनिधी
विजय बकरे
--------------------------------
2005 पूर्वी नियुक्ती असूनही शिक्षण क्षेत्रातील 26 हजार कर्मचाऱ्यांच्यावर जुनी पेन्शन योजना न मिळाल्याने अन्याय होत आहे. निवृत्त झालेल्या अनेक कर्मचाऱ्यांच्या वर बेकारीची कुऱ्हाड तयार झाली आहे. यासाठी येत्या काही दिवसात मुंबई येथील आझाद मैदानावर जलसमाधी आंदोलनासाठी शेकडो कर्मचारी राधानगरी तालुक्यातून जाणार असल्याचा निर्धार कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला.
नरतवडे तालुका राधानगरी येथे जुनी पेन्शन कोअर कमिटी व शिक्षण संघर्ष समिती यांच्यावतीने राधानगरी तालुका स्तरीय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. त्यावेळी कर्मचाऱ्यांनी निर्धार व्यक्त केला यावेळी प्रमुख उपस्थिती जुनी पेन्शन कोर कमिटीचे राज्य कार्याध्यक्ष सुदेश जाधव होते अध्यक्षस्थनी राहूल पाटील होते . स्वागत शिक्षक सेनेचे अध्यक्ष एम.पाटील यांनी केले.
यावेळी बोलताना जाधव म्हणाले गेली पंधरा वर्षे जुन्या पेन्शन साठी शासन दरबारी लढा सुरू आहे. शासनाच्या सर्व आस्थापनातील कर्मचाऱ्यांना 2005 पूर्वी नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शन चा लाभ झाला मात्र शिक्षण क्षेत्रावर शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे अन्याय होत आहे .यासाठी वेळोवेळी आंदोलन, मोर्चे रस्ता, रोको करूनही शासनाला जाग येत नाही .आयुष्यभर प्रामाणिकपणे सेवा करणाऱ्या शिक्षकांना पेन्शनच्या लढ्यासाठी रस्त्यावर उतरावे लागते हे चुकीचे आहे. सप्टेंबर महिन्यामध्ये मुंबई येथील आझाद मैदानावर 26 हजार कर्मचाऱ्यांचा जलसमाधी आंदोलन करणार असून त्याला मोठ्या संख्येने कर्मचारी उपस्थित राहणार असल्याचे जाधव यांनी सांगितले.
, एम एन पाटील, सुरज पाटील, दामोदर येरुडकर, किशोर बरगे, निवास ताम्हणकर, सौ सुनीता पाटील, सौ मंगल शिंदे, सौ. राजश्री कदम, सौ राजनंदिनी हवालदार, सौ वनिता कांबळे, उत्तम तिबिले, प्रभाकर धामणे, अशोक पाटील, एस एम नायकवडे......
आर डी व्हरंबळे, मोहिते जी. पी. जाधव एन एस, एस. बी.पाटील, एस टी,पाटील,एस एम नायकवडे,अंकुश पाटील ,के . व्हि बरगे,प्रवीण दांडेकर,आदीसह उपस्थीत होते.आभार श्री व्हराबळे यांनी मानले.
Comments
Post a Comment