कापशी मधील नराधम शिक्षकांवर कठोर कारवाई व्हावी मुरगुड मधील हिंदुत्ववादी संघटनांची मागणी.
कापशी मधील नराधम शिक्षकांवर कठोर कारवाई व्हावी मुरगुड मधील हिंदुत्ववादी संघटनांची मागणी .

------------------------------------------------
मुरगूड
जोतीराम कुंभार
------------------------------------------------
कागल तालुक्यातील सेनापती कापशी येथील शाळेमध्ये निसार अहमद महोद्दीन मुल्ला या नराधम शिक्षकाने शाळेमधील निरागस विद्यार्थिनींची छेडछाड केली या नराधम शिक्षकावर कठोर कारवाई व्हावी या मागणी साठी मुरगूड हिंदुत्ववादी संघटना शिवभक्त यांच्या वतीने मुरगूड पोलीस स्टेशनला निवेदन देण्यात आले मुरगुडचे एपीआय शिवाजी करे यांनी नागरिकांची मागणी कळवून आरोपीला जास्तीत जास्त शिक्षा व्हावी यासाठी प्रयत्न करू असे सांगितले. नराधम मुल्ला यांनी यापूर्वीही एका शाळेमध्ये असा प्रकार केला होता त्यावेळी देखील त्याला नागरिकांनी चोप दिला होता त्यानंतर त्याची बदली कापशी ते झाली मात्र त्याच्याती प्रकार थांबले नाहीत अनेक मुली भितीमुळे पुढे आल्या नाहीत त्यांची देखील माहिती घेऊन त्यांच्या बाबतीत अशा प्रकार झाले असतील तर त्यांना देखील मुल्ला विरुद्ध तक्रार देण्यासाठी पुढे आणावे असे नागरिकांनी पोलिसांना आवाहन केले यावेळी मोठ्या संख्येने तरुण उपस्थित होते त्यांनी मुल्ला याच्या निषेधाच्या घोषणा दिल्या यावेळी शिवभक्त सर्जेराव भाट , दगडू शेणवी , ओंकार पोतदार, तानाजी भराडे , जावेद मकानदार,मयूर सावर्डेकर, समाधान पवार, पांडुरंग मगदूम, संकेत शहा, जगदीश गुरव, पृथ्वी चव्हाण , आकाश भाट, श्रावण कळंद्रे, अजिंक्य अर्जुने, रुपेश भाट ,युवराज ढोबळे रोमी फर्नांडिस सुशांत चौगुले ,अजिंक्य चौगुले, आकाश भोपळे,अभी मिटके वेदांत मंडलिक, गणेश रजपूत, तुषार पाटील, प्रफुल कांबळे यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments
Post a Comment