नराधम शिक्षकाला कठोर शिक्षेची ॲड विरेंद्र मंडलिकांची मागणी.

 नराधम शिक्षकाला कठोर शिक्षेची ॲड विरेंद्र मंडलिकांची मागणी.

----------------------------------------------------------

मुरगूड
जोतीराम कुंभार
-----------------------------------------------------------

कापशी, ता. कागल, जि. कोल्हापूर येथील एका हायस्कूलमधील सहा. शिक्षक मुल्ला निसार अहमद मोहिद्दीन या नराधमाने अल्पवयीन मुलीबरोबर गैरवर्तन करणाऱ्या आरोपीस कठोर शिक्षा होणेबाबत मा. सहाय्यक पोलीस निरीक्षकसो, मुरगूड पोलीस स्टेशन यांना आज निवेदन देण्यात आले.


आई-वडीलांनंतर ज्यांना पुजले जाते त्या गुरुनेच ही घृणास्पद कृत्य केलेले आहे. नराधम शिक्षकाकडून शिक्षण क्षेत्रास काळीमा फासणारी घटना घडली आहे.

सदर प्रकारात विना दडपण कायद्याच्या चौकटीत राहून व आपल्याही घरी मुलगी, बहीण, पत्नी, आई सारख्या महिला आहेत याचे भान ठेवून योग्य तपास करुन चार्जशिट बनवावे. जेणेकरुन मा. न्यायालयात आरोपीस कठोर शिक्षा मिळेल. त्यासाठी पोलीस प्रशासनाने व पुरोगामी महाराष्ट्रात व राजर्षी शाहुंच्या भुमीत असे प्रकार पुन्हा घडू नयेत म्हणून काम करावे अशी विनंती करण्यात आली. 

      यावेळी ॲड. राणाप्रतापसिंह सासने, जयसिंग भोसले, सुहास खराडे, सुखदेव येरुडकर, एस. व्हि. चौगले, किरण गवाणकर, दत्तात्रय मंडलिक, शशिकांत पाटील इतर उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

अनैतिक प्रेम संबंधातून शिवथर येथील विवाहित महिलेचा गळा कापून खून.

तुरंबे येथील तेरा वर्षाची युवती चे प्रेत विहिरी सापडले.

हिम्मत असेल तर राजेश पवाराणी भिलारेना बोट लावून दाखवावे _ माधव पाटील पवळे.