सादळे मादळे येथे चैतन्य रिसॉर्टवर बिल देण्यावरून फिल्मी स्टाईलने मारहाण करणाऱ्यांच्या विरोधात पोलिसांची धडक कार्यवाही.

 सादळे मादळे येथे चैतन्य रिसॉर्टवर बिल देण्यावरून फिल्मी स्टाईलने मारहाण करणाऱ्यांच्या विरोधात पोलिसांची धडक कार्यवाही.

--------------------------- 

शिरोली प्रतिनिधी

अमीत खांडेकर 

--------------------------- 

सादळे, मादळे येथील चैतन्य व्हॅली रिसॉर्टवर मंगळवारी रात्री बिल देण्याच्या कारणावरून दोन कर्मचाऱ्यांना बेदम करण्यात केल्याची घटना घडली आहे

याबाबत सविस्तर माहिती अशी की,इचलकरंजी ,दानोळी ,यड्राव येथील मित्रपरिवार सादळे, मादळे येथील चैतन्य रिसॉर्टवर पार्टी करण्यासाठी आले होते. जेवण झाल्यानंतर बिल देण्याच्या कारणावरून रिसॉर्ट मधील कर्मचारी  व या तरुणांच्यात वाद झाला., यावेळी किरकोळ धक्काबुक्की झाली.त्यानंतर ते तरुण निघून गेले. थोड्यावेळाने १८ ते २० जण पुन्हा  रिसॉर्टवर काठ्या, कोयता,लोखंडी,रॉड, एडका, तलवार अशी हत्यारे घेऊन आले. रिसोर्ट चे गेट तोडून आतमध्ये प्रवेश केला.रिसॉर्ट ची तोडफोड करण्यास सुरुवात केली. या तोडफोडीत सुमारे  ३ ते ३.५०  लाखांचे नुकसान करण्यात आले आहे.यावेळी भीतीने तेथील महिला कामगार व पुरुष पळून गेले.यावेळी या मद्यधुंद तरुणांनी रिसॉर्ट मधील कर्मचारी सुभाष दत्तात्रय माळी(रा.सादळे) व वैभव मारुती भोसले(रा.मादळे) यांना शिवीगाळ करत बेदम मारहाण केली.

त्यानंतर त्यांना फिल्मी स्टाईल जबरदस्तीने अपहरण करून आपल्या मोटारीच्या डिक्की मध्ये घालून अंकली व तारदाळ येथे घेऊन गेले. तेथे गेल्यानंतर त्यांना डिक्कीतून बाहेर काढले व पाठीमागील सीटवर बसवले.

त्यानंतर  त्यांना पुणे बेंगलोर महामार्गावर पहाटे कासारवाडी फाटा येथे आणून सोडले. हा सर्व थरार रात्रभर चालू होता.झालेल्या प्रकाराची माहिती पोलिसांना सांगितल्यास जिवंत सोडणार नाही अशी धमकी देऊन ते निघून गेले.

त्यानंतर सचिन सदाशिव गोंधळी रा.संभापूर व शिरोली एमआयडीसी पोलिसांच्या सहकार्याने जखमी कर्मचाऱ्यांना  सी पी आर येथे उपचारासाठी दाखल केले. पोलिसांनी धडक कार्यवाही करत १२ जणांना अटक केली आहे. दत्तात्रय मारुती गडकरी(रा.शहापूर,इचलकरंजी), रमेश शिवगण पटेल ( रा.यड्राव,शिरोळ), अनिल बाबुराव पाटील(रा. आसरानगर,इचलकरंजी), सदाशिव किसन कोरवी (रा. यड्राव), रहात लालमहम्मद मुजावर (रा.आसरानगर,इचलकरंजी), निळकंठ आप्पासो कोळी (रा.आसरानगर,इचलकरंजी), सुभाष पोपट काळे (रा.तारदाळ), सिकंदर हुसेनसाब गड्डेकर (रा.खोतवाडी), हरिष रामचंद्र नाईक (रा. यड्राव),पवन अनिल रणदिवे ( रा.पुलाची शिरोली), महेश बजरंग दळवी,(रा.दानोळी), सत्यजित वसंत मोकाशी( रा.दानोळी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. यातील काहीजण शिक्षक,उद्योजक तसेच रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचे समजते.बुधवारी रात्री उशिरा या बारा जणांविरुद्ध शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे. सदर आरोपींना आज  कोल्हापूर येथील न्यायालयात हजर केले असता चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

Comments

Popular posts from this blog

अनैतिक प्रेम संबंधातून शिवथर येथील विवाहित महिलेचा गळा कापून खून.

तुरंबे येथील तेरा वर्षाची युवती चे प्रेत विहिरी सापडले.