महावितरणमार्फत बावडा फिल्टर हाऊस येथील लोड एक्सटेंशनच्या कामामुळे ई वॉर्डचा सोमवारी पाणी पुरवठा बंद.

 महावितरणमार्फत बावडा फिल्टर हाऊस येथील लोड एक्सटेंशनच्या कामामुळे ई वॉर्डचा सोमवारी पाणी पुरवठा बंद.

**********************

संस्कार तारळेकर.

**********************

कोल्हापूर ता.25 : महावितरणामार्फत बावडा फिल्टर हाऊस येथील लोड एक्सटेंशन करण्यात येणार आहे. हे काम सोमवार दि.28 जुलै 2025 रोजी बावडा सकाळी 10 ते दुपारी 4 या वेळेत करण्यात येणार आहे. त्यामुळे बावडा फिल्टर हाऊस येथून पाणी पुरवठा बंद राहणार असलेने कसबा बावडा जलशुध्दीकरण केंद्रावर अवलंबून असणारा संपूर्ण भाग, कसबा बावडा उंच टाकी, ताराबाई पार्क उंचटाकी, टेंबलाई टाकीवरील संपूर्ण भाग आणि कावळा नाका उंच टाकीवरील अंशत: भागातील नागरीकांना सोमवार, दिनांक 28 जुलै 2025 रोजी दैनंदिन होणारा पाणी पुरवठा होऊ शकणार नाही. तर मंगळवार दिनांक 29 जुलै 2025 रोजी होणारा दैनंदिन पाणी पुरवठा अपूरा व कमी दाबाने होईल.

            यामध्ये या टाकीवर अवलंबून असलेला कसबा बावडा उंच टाकीवरील संपूर्ण बावडा परिसर, लाईन बजार, कदमवाडी-जाधववाडी, न्यु पॅलेस परिसर, रमणमळा, ताराबाई पार्क, सदर बाजार, कनाननगर, ताराबाई पार्क, नागाळा पार्क, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, साईक्स एक्सेक्टेन्शन, शाहुपूरी, रेल्वे स्टेशन रोड, न्यु शाहुपूरी, शिवाजीपार्क, रूईकर कॉलनी, मार्केट यार्ड, बापट कॅम्प इत्यादी भागामध्ये होणारा दैनंदिन पाणी पुरवठा होऊ शकणार नाही. या भागातील नागरिकांना दैनंदिन पिण्याचे पाणी पुरवठा होण्याच्या दृष्टीने महानगरपालिकेकडील उपलब्ध टँकरव्दारे पिण्याचे पाणी पुरवठा करण्याचे नियोजन केले आहे.

            तरी या भागातील नागरिकांनी उपलब्ध होणारे पाणी काटकसरीने वापरून महानगरपालिकेस सहकार्य करावे असे आवाहन महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.

Comments

Popular posts from this blog

अनैतिक प्रेम संबंधातून शिवथर येथील विवाहित महिलेचा गळा कापून खून.

गणेश टॉकीज जवळ बुलेट ने ठोकर दिल्याने एका महिलेचा मृत्यू.तर दोघेजण जखमी.

तुरंबे येथील तेरा वर्षाची युवती चे प्रेत विहिरी सापडले.