माजी आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांची कर्जमाफी सातबारा कोरा अशा अनेक मागणीसाठी अमरावती नागपूर हायवे वर रास्ता रोको.
माजी आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांची कर्जमाफी सातबारा कोरा अशा अनेक मागणीसाठी अमरावती नागपूर हायवे वर रास्ता रोको.
----------------------------------------
अमरावती जिल्हा प्रतिनिधी.
पी एन देशमुख.
----------------------------------------
अमरावती .आज दिनांक 24 जुलै रोजी संपूर्ण महाराष्ट्र प्रहार जनशक्ती पार्टी च्या वतीने शेतकऱ्यांची कर्जमाफी व सातबारा कोरा तसेच अपंग, विधवा, शेतमजूर अशा अनेक मागण्यांसाठी रास्ता रोको करण्यात आले त्याच पार्श्वभूमीवर आज अमरावती नागपूर हायवे नांदगाव टोलनाका जवळ बच्चू कडू यांचे नेतृत्वात रस्ता रोको करण्यात आला यावेळी दिव्यांग विधवा अपंगत्व शेतकरी मोठ्या संख्येने तसेच प्रहार जनशक्ती पक्षाचे कार्यकर्ते सुद्धा उपस्थित होते
कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचा यावेळी पत्ते खेळून निषेध करण्यात आला
अशी कशी देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही, या सरकारचं करायचं काय खाली डोके वरती पाय अशा अनेक प्रकारच्या घोषणा यावेळी देण्यात आल्या तसेच यावेळी मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी झाली होती एक ते दोन किलोमीटर वाहना च्या रांगा रागाच लागल्या होत्या यावेळी प्रहार जनशक्ती पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या वतीने संपूर्ण रस्ता दोन्ही बाजूला बंद करण्यात आला होता.
पण यावेळी दोन ॲम्बुलन्स मध्ये पेशंट नेत नसताना त्यांना रस्ता मोकळा करून दिला यावेळी माणुसकीचे दर्शन सुद्धा पाहायला मिळाले.
Comments
Post a Comment