दहा वर्षापासून यंत्रणेला देत होता गुंगारा अकोला जिल्ह्यातून अटक.

दहा वर्षापासून यंत्रणेला देत होता गुंगारा अकोला जिल्ह्यातून अटक. 

वांटेड दरोडखोर तलवार सिंग राजापेठ पोलिसांकडून ट्रॅप 100 वर गुन्हे दाखल, 

***********************

 फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

 पी एन देशमुख. 

 अमरावती जिल्हा प्रतिनिधी. 

**********************

 अमरावती. शहर आयुक्तलया यासह राज्यातील विविध पोलीस ठाण्यात चोरी राबरी, दरोडा, खून व कोणाचा प्रयत्न असे शेकडो गुन्हे दाखल असलेल्या कुख्यात आरोपीला राजापेठ पोलिसांनी अकोल्या जिल्ह्यातील त्याच्या नायगाव या राहत्या घरातून अटक केली. १७ जुलै रोजी ही कारवाई करण्यात आली अब्दुल रचित उर्फ तलवार सिंग अब्दुल हमीद रा. नायगाव मेहबूबिया मशीद जवळ अकोला असे अटक कुख्याताचे नाव आहे. तलवार सिंग म्हणून गुन्हेगारी जगातात कुप्रसिद्ध असलेला अ. रशीद विरुद्ध अनेक गुन्हे दाखल आहेत. अलीकडे शहर आयुक्तालय सह वर्धा,, चंद्रपूर, वर्धा यवतमाळ, नागपूर, व रेल्वे पोलीस त्याच्या मार्गावर होते. त्याच्याविरुद्ध शेकडोच्या संख्येने गुन्हे दाखल असल्याने तो दहा वर्षापासून न्यायालयीन तारखेवर देखील हजर राहत नव्हता. त्यामुळे विविध पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध पकड वॉरंट, प्राप्त झाले आहे त्याला न्यायालयाने फरार सुद्धा घोषित केले आहे. आरोपी तलवार सिंग हा अट्टल व सराई चोर असल्याने तो चोरीसाठी वेगवेगळ्या जिल्ह्यात फिरत असतो किंवा कोणत्या ना कोणत्या गुन्ह्यांमध्ये जेलमध्ये असतो त्यामुळे तो त्याच्या राहत्या घरी नायगाव येथे मिळून येत नव्हता दरम्यान 16 जुलै रोजी तो नायगाव परिसरात वावरत असल्याची माहिती अमरावती येथील राजापेठ पोलिसांना मिळाली तक्षणी अमरावती राजापेठ चे ठाणेदार पुणे कुलट यांनी हवालदार आशिष विघे,विक्रम देशमुख,जगदीश वानखडे, अबितशेख, विजय यादव यांना तातडीने अकोलात रवाना केले. वॉरंट पथकाने त्याला ताब्यात घेऊन अमरावती राजापेठ पोलीस स्टेशनला अटक करून आणले. अमरावती राजापेठ पोलीस स्टेशन ठाण्यात सन २0१८ मध्ये चोरीचा गुन्हा दाखल असल्याकारणाने त्याला अटक करण्यात आली.

Comments

Popular posts from this blog

अनैतिक प्रेम संबंधातून शिवथर येथील विवाहित महिलेचा गळा कापून खून.

तुरंबे येथील तेरा वर्षाची युवती चे प्रेत विहिरी सापडले.

हिम्मत असेल तर राजेश पवाराणी भिलारेना बोट लावून दाखवावे _ माधव पाटील पवळे.