कुपवाड रामकृष्ण नगर अमोल रायते या युवकाचा खून.
कुपवाड रामकृष्ण नगर अमोल रायते या युवकाचा खून.
-------------------------------
मिरज तालुका प्रतिनिधी
राजू कदम
-------------------------------
सांगली जिल्ह्यात खुनाच्या घटनांना उधाण आले असून, कुपवाडमधील रामकृष्ण नगर येथील स्वामी समर्थ मंदिराजवळ अमोल रावसाहेब रायते (वय ३२) या युवकाचा निर्घृण खून करण्यात आला. काल रात्रीच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने त्याच्या डोक्यात मोठा दगड घालून हत्या केली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच कुपवाड औद्योगिक पोलीस दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवला आहे. दरम्यान, खून असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक भांडवलकर यांनी दिली. पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.
No comments: