महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने वाई शहर भाजपच्या वतीने वाईमध्ये महा रक्तदान शिबिर.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने वाई शहर भाजपच्या वतीने वाईमध्ये महा रक्तदान शिबिर.
----------------------------------
वाई प्रतिनिधी
कमलेश ढेकाणे
----------------------------------
दि. 22-07-2025 आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने
भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांनी जास्तीत जास्त संख्येने रक्तदाना च्या देशकार्यात आपला सक्रिय सहभाग नोंदवला.
या प्रसंगी वाई शहर अध्यक्ष विजय ढेकाणे यांनी स्वतः रक्तदान करून आपला सहभाग नोंदवला, तसेच याप्रसंगी वाई तालुका अध्यक्ष दिपक ननावरे, वाई तालुका पश्चिमचे अध्यक्ष गणेश सुतार यांनीही सक्रिय सहभाग नोंदवला, जेष्ठ सदस्य काशिनाथ जी शेलार यांनी सुद्धा रक्तदान करून आपला सहभाग नोंदवला. तसेच रक्तदान कार्यक्रमास शुभेच्छा देण्यासाठी स्वतः भाजप महाराष्ट्र राज्य परिषद सदस्य आदरणीय मदन दादा भोसले यांनीही उपस्थित राहून सर्व रक्तदात्यांचे आभार मानले, व त्यांना प्रशस्तीपत्र व गणेश मूर्ती देऊन त्यांच्या सन्मानही केला. या कार्यक्रमास भाजपचे अविनाशजी फरांदे, यशवंंतजी लेले, रोहिदास बापू पिसाळ, तेजस दादा जमदाडे, सुरज जमदाडे, सचिन घाटगे, दत्ता ढेकाणे, नाना कायंगुडे, तुषार चक्के, विकास जाधव, सुधीर भागवत, सुनील साठे, ओम काळोखे,गणेश जायगुडे, व भाजपच्या महिला पदाधिकारी सारिका गवते, भारती कुलकर्णी, मनीषा घैसास, पौर्णिमा कांबळे, ज्योती गांधी, सुनंदा कट्टे व कार्यकर्ते उपस्थित होते.
सकाळी 10:00 ते दुपारी 3:00 वाजेपर्यंत जवळजवळ 115 पेक्षा जास्त रक्तदात्यांनी रक्तदान केले.
बेल एअर हॉस्पिटलचे सर्वे सर्वा फादर टॉमी सर यांनीही रक्तदान शिबिरास भेट दिली. बेल एअर ब्लड बँकेने केलेल्या सहकार्याबद्दल गणेश मूर्ती व आभार पत्र देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.
Comments
Post a Comment