एक दिवस गावासाठी पुढच्या पिढीच्या भविष्यासाठी" हा संदेश देत डांगरेघर ग्रामपंचायत डांगरेघर यांच्या माध्यमातून वृक्षारोपण.

 एक दिवस गावासाठी पुढच्या पिढीच्या भविष्यासाठी" हा संदेश देत डांगरेघर ग्रामपंचायत डांगरेघर  यांच्या माध्यमातून वृक्षारोपण.

-----------------------------------

 जावली  प्रतिनिधी

शेखर जाधव.

-----------------------------------

सातारा/ जावली :- "एक दिवस गावासाठी पुढच्या पिढीच्या भविष्यासाठी" हा संदेश देत डांगरेघर ता. जावली  येथील वृक्षप्रेमी मित्र मंडळ ऐरोली स्पोर्ट्स असोसिएशन ऐरोली आणि ग्रामपंचायत डांगरेघर  यांच्या माध्यमातून वृक्षारोपण  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात  आले 

 यावेळी धावली डांगरेघर घाट  रस्त्याच्या दुतर्फा तसेच मंदिर परिसरात प्राथमिक शाळा परिसरात गावामध्ये फळ झाडे तसेच डोंगर परिसरात ५००+ झाडांचे वृक्षारोपण करण्यात  आले. सध्या विकासाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड होत असून या मुळे निसर्गाची खूप मोठ्या प्रमाणात हानी होत आहे.तसेच वणव्यामुळे सुद्धा हजारो  झाडे नष्ट होतात. त्यामुळे वृक्षारोपण हि काळाची गरज असून पुढच्या पिढयांचे स्वास्थ बळकट करायचे असेल तर वृक्षारोपण खूप महत्वाचे आहे. तशीच समाजातील प्रत्येकाने निसर्गाशी मैत्री करत वृक्षारोपण  करून त्याचे संवर्धन करावे ही भावना ऐरोली स्पोर्ट्स असोसिएशन चे पदाधिकारी यांनी व्यक्त केली वड, पिंपळ,आंबा, जांभूळ, लिंबू,फणस या  वृक्षांची  लागवड करण्यात आली. तसेच यावेळी ऐरोली स्पोर्ट्स असोसिएशन च्या पदाधिकाऱ्यांनी प्राथमिक शाळेतील मुलांसाठी टी - शर्ट तसेच खाऊ वाटप करण्यात आला, क्रीडा क्षेत्रातील गरजेच्या वस्तूंची मागणी करण्याचे आव्हान करण्यात आले तसेच या उपक्रमास सर्वोतोपरी सहकार्य करायचे आश्वासन दिले त्यांनी झाडे लावण्यासाठी आणि ती जगवण्यासाठी ५१०००/-  रुपये ची गावास देणगी स्वरूपात मदत केली मुंबई स्थित निसर्ग प्रेमी ग्रामस्थांकडून या कामासाठी देणगी स्वरूपात रक्कम गोळा केली त्यातून झाडे तसेच पुढील वृक्षसंगोपणासाठी उपाययोजना बाबतचे चे नियोजन करण्यात आले या वेळी नवी मुंबई येथून ऐरोली स्पोर्ट्स  असोसिएशन चे अध्यक्ष डॉ.संजय डोके, उपाध्यक्ष श्री.केतन वखारिया, जनरल सेक्रेटरी डॉ. हेमंत अनार्थे , ए एस ए ग्रिनथॉन ऐरोली स्पोर्ट्स असोसिएशन चे कॉर्डिनेटर श्री. गिरीश चौधरी, कमिटी मेंबर ऐरोली स्पोर्ट्स असोसिएशन श्री.मोहन शेट्टी श्री.रमेश देवकर, दिपक सुर्वे तसेच डांगरेघर गावातील सर्व मुंबईस्थित निसर्गप्रेमी वृक्षप्रेमी ग्रामपंचायत डांगरेघर चे सरपंच उपसरपंच सर्व सदस्य तसेच डांगरेघर ग्रामस्थ उपस्थित होते अमोल आंग्रे यांनी  प्रस्तावना केली या नंतर गावाबद्दल माहिती श्री. भगवान कांबळे यांनी दिली या नंतर ऐरोली स्पोर्ट्स असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले संपत सुर्वे ( गुरुजी ) यांनी निसर्गप्रेमींचे आभार मानून हा कार्यक्रम संपन्न झाला .....

Comments

Popular posts from this blog

अनैतिक प्रेम संबंधातून शिवथर येथील विवाहित महिलेचा गळा कापून खून.

गणेश टॉकीज जवळ बुलेट ने ठोकर दिल्याने एका महिलेचा मृत्यू.तर दोघेजण जखमी.

तुरंबे येथील तेरा वर्षाची युवती चे प्रेत विहिरी सापडले.