निवृत्तीनंतर कोणतीही शासकीय लाभाचे पद स्वीकारणार नाही. सर न्यायाधीश भूषण गवई यांचे मोठे विधान : मुळगाव दारापूरला भेट.
निवृत्तीनंतर कोणतीही शासकीय लाभाचे पद स्वीकारणार नाही. सर न्यायाधीश भूषण गवई यांचे मोठे विधान : मुळगाव दारापूरला भेट.
------------------------------------------
अमरावती जिल्हा प्रतिनिधी
पी.एन. देशमुख. .
8600780075
------------------------------------------
अमरावती. ( दारापूर ) सर्वोच्च न्यायालयाचे विद्यमान सरन्यायाधीश आणि महाराष्ट्राचे सुपुत्र असलेले भूषण गवई यांनी निवृत्तीनंतर कोणतीही शासकीय लाभाचे पद स्वीकारणार नसल्याचे म्हटले आहे. मी निवृत्तीनंतर जास्तीत जास्त वेळ दारापूर, अमरावती आणि नागपुरात या आपल्या मूळ गावी घालवणार असल्याचे गवई यांनी म्हटले आहे आहे. सरन्यायाधीश झाल्यानंतर प्रथमच भूषण गवई हे हे त्यांच्या मूळ गाव असलेल्या दारापुरात पोहोचले होते. यावेळी ते गावकऱ्यांशी बोलत होते. सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या गावातील नागरिकांच्या वतीने जल्लोषात स्वागत करण्यात आले. सर नायक यांना पाहण्यासाठी गावकऱ्यांनी देखील मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. गावात पोचतात गवई यांनी आपल्या लहानपणीच्या आठवणींना उजाळा दिला. तसेच जुन्या घराला देखील भेट दिली. यावेळी सरन्यायाधीश यांनी वीकंदर महाराज, राजे बुवा महाराज, हनुमान मंदिर आदी ठिकाणी भेट देऊन दर्शन घेतले. शाळेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी अगदी उत्साहात स्वागत केले. भारत माता की जय अशा घोषणा दिल्या. एकोप्याने राहणाऱ्या गावाची प्रतीक म्हणजे दारापूर गाव असल्याचे सरन्यायाधीश यांनी म्हटले सर न्यायाधीश भूषण गवई यांचे दुपारी चार वाजता गुरुवारी बेलोरा विमानतळावर आगमन झाले. यावेळी खासदार बळवंत वानखडे आमदार रवी राणा विभागीय आयुक्त श्वता सिंघल विशेष पोलीस महानिरीक्षक रामनाथ पोकळे, जिल्हाधिकारी आशिष शेरेकर, पोलीस आयुक्त अरविंद चावरिया, पोलीस अधीक्षक विशाल आनंद अप्पर पोलीस पंकज कुमवत आधी उपस्थित होते. सरन्याधी भूषण रामकृष्ण गवई हे भारताचे५२वे सरन्यायाधीश आहेत. त्यांचा जीवनप्रवास महाराष्ट्रातील अमरावती पासून सर्वोच्च न्यायालय पर्यंत एक प्रेरणादायी प्रवास आहे.
Comments
Post a Comment