जावळीत शिवसेना भक्कम करणार.
जावळीत शिवसेना भक्कम करणार.
**********************
प्रतिनिधी/ शेखर जाधव
***********************
सातारा,जावली :- जावळी तालुका हा शिवसेनेचा बालेकिल्ला होता आणि भविष्यात तो कायम करणार असलेचे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख रणजितसिंह भोसले यांनी मेढा येथे काढले . जावळी तालुक्यातील पदाधिकारी याची आढावा सभा मेढा येथे संपन्न झाली त्यावेळी जावली तालुक्यातील शिवसेनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. सदर बैठकीत पंचायत समिती,जिल्हा परिषद, नगरपंचायत मेढा येथील पदाधिकारी याचा आढावा घेणेत आला, माझे शिवसेनेतील पदाधिकारी हा कोणत्याही राजकीय वळचणीला बसलेला नसावा.तो कट्टर शिवसैनिक असावा.भविष्यात फक्त आणि फक्त शिवसेनाच त्याच्या मनात असायला हवी,
पंचायत समिती,जिल्हा परिषद, नगरपंचायत मध्ये महायुती करायची कि नाही हे आपण ठरवायचं नाही ते आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब व पालकमंत्री ठरवतील त्यामुळे कोणीही काळजी करू नका आपण फक्त त्यांनी केलेल्या कामाचं मार्केटिंग जबाबदारीन करायचं आहे
कारण भविष्यात जावळी शिवसेनेचा बालेकिल्ला करूयात असा ठाम निर्धार सर्वांनी यां निमित्त करायचा आहे .
जो पदाधिकारी कोणाच्या मांडीवर जाऊन बसत असेल त्याला जिल्हा प्रमुख या नात्याने मी पक्ष शिस्त शिकवेन. आपण पक्षाचे शिलेदार आहोत पक्ष वाढीसाठी प्रत्येकाचं योगदान असलच पाहिजे, अशा सूचना सर्वाना दिल्या.
कार्यक्रम प्रसंगी उपजिल्हा प्रमुख संदीप पवार, वाई विधानसभा संघटक विकास अण्णा शिंदे, जिल्हा समन्व्यक प्रदीप माने,युवा सेना जिल्हा संघटक राजु केंजळे , विद्यार्थी सेना जिल्हा प्रमुख संभाजी पाटील, जावळी तालुका प्रमुख शांताराम कदम, मेढा शहर प्रमुख संजय सुर्वे, युवा सेना उपजिल्हा प्रमुख विशाल सपकाळ, युवा सेना उपजिल्हा प्रमुख नवनाथ पाटील, महिला आघाडीच्या विद्या बर्गे,सीमा पवार,प्रियांका दळवी, उपतालुका प्रमुख सचिन शेलार, आदी मान्यवर उपस्थित होते.
No comments: