सदाशिवराव मंडलिक महाविद्यालयात लोकसंख्या दिनानिमित्त व्याख्यान ,निबंध स्पर्धा व जनजागृती उपक्रमांचे आयो

 सदाशिवराव मंडलिक महाविद्यालयात लोकसंख्या दिनानिमित्त व्याख्यान ,निबंध स्पर्धा व जनजागृती उपक्रमांचे आयोजन.

**********************

मुरगुड : जोतीराम कुंभार

**********************

तरुणांच्या सहभागातून लोकसंख्या दिनाला प्रबोधनात्मक स्वरूप – प्राचार्य डॉ. शिवाजी होडगे.

सदाशिवराव मंडलिक महाविद्यालयात दिनांक ११ जुलै रोजी जागतिक लोकसंख्या दिन साजरा करण्यात आला.* *“तरुणांना निष्पक्ष आणि आशादायक जगात त्यांना हवे असलेले कुटुंब निर्माण करण्यासाठी सक्षम करणे”* ही सन २०२५ ची थीम या कार्यक्रमात अधोरेखित करण्यात आली.

या कार्यक्रमाचे उद्घाटन प्राचार्य डॉ. शिवाजी होडगे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. त्यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात सांगितले की, *भारतातील तरुण वर्गाचा आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक व राजकीय विकासात मोठा वाटा असून कृषी, उद्योग, सेवा, शिक्षण, तंत्रज्ञान व नवसंशोधन क्षेत्रातही त्यांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. आजही आपल्या समाजामध्ये स्त्री पुरुष समानता नसल्यामुळे वंशाच्या दिव्याची मागणी केली जाते . त्यामुळे जोपर्यंत मुलगा जन्माला येत नाही तोपर्यंत अपत्य जन्माला घातली जातात . ही मानसिकता बदलणे गरजेचे आहे. वाढती लोकसंख्या ही जरी एक आव्हान असले तरी तिचे योग्य नियोजन केल्यास ती भारतासाठी सुवर्णसंधी ठरू शकते, असे त्यांनी स्पष्ट केले.


या कार्यक्रमाचे आयोजन अर्थशास्त्र विभागाच्या वतीने करण्यात आले होते. विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा, घोषवाक्य स्पर्धा आणि प्रश्नमंजुषा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी प्रा. रामचंद्र पाटील आणि कु. वैष्णवी शिंदे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

 कार्यक्रमासाठी उपप्राचार्य 

 डॉ शिवाजी पोवार, नॅक समन्वयिका डॉ. माणिक पाटील, प्रा. तानाजी सातपुते, प्रा. स्वप्निल मेंडके, प्रा. अवधूत पाटील, प्रा. मनीषा पाटील, प्रा. अर्चना कांबळे, प्रा. दिपाली सामंत, प्रा. गोरुले आदी मान्यवर तर महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेत जनजागृतीचा संदेश दिला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. संजय हेरवाडे यांनी केले तर आभारप्रदर्शन प्रा. सोनाली कुंभार यांनी केले.या कार्यक्रमाचे यशस्वी संयोजन अर्थशास्त्र विभागाने केले होते.

Comments

Popular posts from this blog

अनैतिक प्रेम संबंधातून शिवथर येथील विवाहित महिलेचा गळा कापून खून.

गणेश टॉकीज जवळ बुलेट ने ठोकर दिल्याने एका महिलेचा मृत्यू.तर दोघेजण जखमी.

तुरंबे येथील तेरा वर्षाची युवती चे प्रेत विहिरी सापडले.