Header Ads

गरीब, गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य किटचे वाटप.

गरीब, गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य किटचे वाटप.

**************************
चंदगड प्रतिनिधी
आशिष पाटील 
***************************

ताम्रगड प्रतिष्ठानला चांगल्या गोष्टीचा ध्यास : डॉ अमोल पाटील

          कोवाड : ताम्रगड प्रतिष्ठानने गावाशी नाळ जोडलेली माणसे जोडली आहेत. त्यातूनच हे सर्व गावच्या मुलांसाठी काम करत आहेत. अभ्यासिका, मॅरेथॉन, महिला सबलीकरण, मार्गदर्शन केंद्र चालू केले आहे. म्हणूनच ही दैवतुल्य माणसे आहेत. या सेवेचा समाजाला नक्की उपयोग होईल, असे मत अभिनव अकॅडमीचे डॉ. अमोल पाटील यांनी व्यक्त केले.


सेवा सहयोग, पुणे व ताम्रगड प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विध्यमाने तालुक्यातील गरीब व गरजू विद्यार्थ्यांना स्कुल किट वाटप शनिवारी (दि १२ रोजी) श्रीराम विद्यालय, कोवाड येथे करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य एस.टी. कदम होते. यावेळी डॉ अमोल पाटील, एन आर पाटील, प्रा.एस.टी. कदम यांच्या हस्ते हायस्कुल, प्राथमिक शाळेतील ४५० विद्यार्थ्यांना स्कुल किट साहित्याचे वाटप केले.

तसेच ढोलगरवाडी, किणी, सुंडी, तेऊरवाडी, मांडेदुर्ग, कामेवाडी, डुंडगे, तुर्केवाडी, कोवाड, काल कुंद्री,नागरदळे, बगीलगे, कारवे, बांद्रा, म्हाळुंगे, कलीवडे, जगमहट्टी, नगरगाव, हलकर्णी, फोंडयाचीवाडी (पार्ले), कडलगे बुद्रुक, शिवणगे, कल्याणपूर, कुदनूर, बसर्गे, बुकींयाळ बु., कौलगे, जकनहट्टी, घुलेवाडी, निट्टूर, मलतवाडी, म्हाळेवाडी, किटवाड, आंबेवाडी, आश्रम शाळा, कोवाड इत्यादी शाळांना शैक्षणिक साहित्य वाटप केले.


ताम्रगड प्रतिष्ठानचे अध्यक्ष एन.आर. पाटील यांनी तीन वर्षात प्रतिष्ठान ने सुरू केलेल्या मॅरेथॉन स्पर्धा, मुलांसाठी कोवाड येथे चालू केलेली अभ्यासिका, मार्गदर्शन केंद्र, गरजू विद्यार्थ्यांना मदत, महिला सबलीकरण, राबवत असलेले सामाजिक उपक्रम याबद्दल काम करत असल्याचे सांगितले.

कार्यक्रम प्रसंगी शैलेश घाटपांडे (ceo सेवा सहयोग, विनोद ठाकूर (सेवा वर्दीनी, पुणे), संजय रेडेकर, अजय पवार, एस.एम. माने, अजित चोथे, संजय कुट्रे, शशी खोरटे,सुभाष बेळगावकर, आर.टी. पाटील, अशोक वरपे, गुलाब पाटील, राजू नाकाडी, कोनेरी पाटील, विनायक पोटेकर आदी उपस्थित होते. 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एस.पी. पाटील यांनी केले व आभार दयानंद सलाम यांनी मानले.

No comments:

Powered by Blogger.