श्री सरस्वती विद्यालयात 'माता सन्मान मेळावा' संपन्न.
श्री सरस्वती विद्यालयात 'माता सन्मान मेळावा' संपन्न.
***********************
चंदगड प्रतिनिधी-आशिष पाटील
***********************
कालकुंद्री (ता.चंदगड) येथील सरस्वती विद्यालय व लोकनेते तुकाराम दत्ताजी पवार ज्युनिअर कॉलेजमध्ये शनिवारी (दि. १२ रोजी) सरपंच छाया जोशी यांच्या अध्यक्षतेखाली 'माता सन्मान मेळावा' संपन्न झाला .
याप्रसंगी किशोरवयीन मुलींच्या आरोग्यविषयक समस्या व त्यावर उपाय या विषयावर डॉ.संजीवनी संजय तळगुळकर यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून महिला पोलीस पाटील संगीता कोळी या उपस्थित होत्या.
विद्यालयातील जेष्ठ शिक्षिका एल आर तुपारे यांनी महिला सन्मान मेळाव्याचे महत्त्व स्पष्ट केले. या कार्यक्रमाला सुप्रिया तेऊरवाडकर, सीमा पाटील, विजया दैठणकर, विद्यालयातील विद्यार्थिनी तसेच कालकुंद्री, किटवाड व कुदनुर येथील विद्यार्थ्यांच्या माता उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे निवेदन नीता कुंभार यांनी केले. तर उपस्थितांचे आभार कुमारी सानिका पाटील हिने मांडले.
Comments
Post a Comment