पत्रकारितेच्या माध्यमातून प्रबोधनाची गरज : प्राचार्य डॉ. शिवाजी होडगे.
पत्रकारितेच्या माध्यमातून प्रबोधनाची गरज : प्राचार्य डॉ. शिवाजी होडगे..
---------------------------------
मुरगूड प्रतिनिधी
जोतीराम कुंभार
---------------------------------
आजचे दाहक सामाजिक वास्तव पाहता लोकांमध्ये सामाजिक भान आणण्यासाठी पत्रकारांनी आपल्या लेखणीच्या माध्यमातून सामाजिक प्रबोधन करणे अत्यंत गरजेचे आहे असे प्रतिपादन सदाशिवराव मंडलिक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवाजी होडगे यांनी केले. ते "ग्रामीण पत्रकारिता व जनसंवाद" अभ्यासक्रम उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या गुणगौरव समारंभ प्रसंगी बोलत होते. यावेळी कोर्सचे समन्वयक प्रा. सुशांत पाटील यांनी स्वागतपर प्रास्ताविक केले.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना पत्रकारितेची ओळख व्हावी, इथल्या ग्रामीण प्रश्नांची जाणिव त्यांच्यात निर्माण होऊन ते प्रश्न त्यांनी आपल्या लेखणीच्या माध्यमातून मांडावेत याकरिता अनेक वर्षांपासून शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर आणि सदाशिवराव मंडलिक महाविद्यालय, मुरगूड यांच्यामार्फत "ग्रामीण पत्रकारिता आणि जनसंवाद" अभ्यासक्रम चालवला जातो. एकूण दहा विद्यार्थ्यांनी यासाठी प्रवेश घेतला होता. यामध्ये कु. प्रमिला विलास कांबळे हिने प्रथम तर श्री. विश्वनाथ पांडुरंग चौगले व कु. धनश्री धोंडीराम मगदूम यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त केला. यावेळी प्रा. स्वप्नील मेंडके, प्रा. राहुल बोटे यांचाही गौरव करण्यात आला. एकंदरीत सर्वांनी चांगले गुण प्राप्त करून १००% निकालाची परंपरा कायम राखली.
यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.डॉ.शिवाजी पोवार यांनी आभार मानले. याप्रसंगी प्रा.डॉ. माणिक पाटील, प्रा.डी.व्ही. गोरे, प्रा. नितेश रायकर,प्रा.डी.डी.खतकर प्रा.आर.एस.पाटील आदी प्राध्यापक व ग्रामीण पत्रकारितेचे विद्यार्थी उपस्थित होते.
Comments
Post a Comment