Header Ads

रेंदाळ येथे गावसभेत दारु दुकान बंदी ठराव असताना देखील नवीन बिअर बार व परमिट रुम परवानगी - रेंदाळ ग्रामस्थांचा तीव्र विरोध दिला आंदोलनाचा इशारा.

 रेंदाळ येथे गावसभेत दारु दुकान बंदी ठराव असताना देखील नवीन बिअर बार व परमिट रुम परवानगी - रेंदाळ ग्रामस्थांचा तीव्र विरोध दिला आंदोलनाचा इशारा.

-----------------------------–----

रेंदाळ प्रतिनिधी

सचिन कुंभार 

-----------------------------–----

             रेंदाळ ता. हातकणंगले माळी मळा परिसरामध्ये लोकवस्ती व अंगणवाडी शेजारी असताना देखील बियर बार चालू करणेसाठी ग्रामपंचायत पंचायतकडे  ना हरकत दाखला मागणी करण्यात आला आहे हे समजाताच येथील नागरिकांनी ग्रामपंचायत व हुपरी पोलीस स्टेशनला धाव घेत नवीन बियर बार व परमिट रुमला तीव्र विरोध दर्शविला तसेच ग्रामपंचायत येथे ग्रामसेवक श्री एकनाथ सुर्यवंशी व हुपरी पोलीस स्टेशन येथे पी.आय चौखंडे यांना निवेदन देण्यात आले. गावसभेत २००९  साली गावात कोणतेही दारू दुकान होऊ नये असा ठराव मंजूर करण्यात आला होता त्यामुळे गावसभेत ठरल्याप्रमाणे नियम न मोडता ग्रामपंचायत प्रशासनाने परवाना देऊ नये अशी मागणी ग्रामस्थांनी केली.

ना हरकत दाखला दिल्यास  लेखी निवेदन देऊन तीव्र आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला.

यावेळी उदय पाटील,संतोष पाटील,आर पी आय रेंदाळ शहर अध्यक्ष संतोष शिंगे, शिवसेना शहर प्रमुख शरद पाटील,बाळकृष्ण पाटील,हर्ष कुमार पाटील,सचिन दानोळे,विजय घोरपडे, विश्वनाथ माळी,बाबुराव पाटील,आशिष कोरे,अमोल माळी,संदीप कोरे, अमित माळी व इतर नागरिक उपस्थित होते.

No comments:

Powered by Blogger.