शिरसे एसटी स्टँडजवळ कारला भीषण आग.

 शिरसे एसटी स्टँडजवळ  कारला भीषण आग.

-------------------------------- 

राधानगरी प्रतिनिधी 

विजय बकरे

-------------------------------- 

शिरसे, ता. राधानगरी: येथील एसटी स्टँड परिसरात काल (गुरुवारी) रात्री सात वाजण्याच्या सुमारास सर्व्हिसिंग ला घेऊन जात असताना मारुती ८०० कारला अचानक आग लागल्याने एकच खळबळ उडाली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र आगीमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

मिळालेल्या माहितीनुसार, शिरसे येथील एका सर्व्हिस सेंटरशेजारी दुरुस्तीसाठी आणलेल्या मारुती ८०० कारमध्ये अचानक शॉर्ट सर्किट झाले आणि काही क्षणातच आगीने रौद्ररूप धारण केले. आग लागताच चालकाने प्रसंगावधान राखत तात्काळ गाडीतून उडी मारल्याने तो सुरक्षित बचावला.

आगीच्या घटनेमुळे परिसरात एकच गोंधळ उडाला. स्थानिक नागरिकांनी तातडीने भोगावती सहकारी साखर कारखान्याच्या अग्निशमन दलाला पाचारण केले. अग्निशमन  पथका च्या प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवले. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले, तरी शॉर्ट सर्किट हे प्राथमिक कारण मानले जात आहे. या आगीत कारचे मोठे नुकसान झाले आहे.

Comments

Popular posts from this blog

अनैतिक प्रेम संबंधातून शिवथर येथील विवाहित महिलेचा गळा कापून खून.

तुरंबे येथील तेरा वर्षाची युवती चे प्रेत विहिरी सापडले.

हिम्मत असेल तर राजेश पवाराणी भिलारेना बोट लावून दाखवावे _ माधव पाटील पवळे.