२००५ पूर्वी नियुक्त कर्मचाऱ्यांचे सकारात्मक पत्र मिळण्यासाठी निवेदन.
२००५ पूर्वी नियुक्त कर्मचाऱ्यांचे सकारात्मक पत्र मिळण्यासाठी निवेदन.
-----------------------------------
कोल्हापूर प्रतिनिधी
विजय बकरे
------------------------------------
जुनी पेन्शन मिळावी यासाठी गेली १४वर्षे पाठपुरावा २००५ पूर्वी नियुक्त झालेले शिक्षक व शिक्षक कर्मचारी जुनी पेन्शन संघर्ष समितीच्या वतीने करत आहेत. यासाठी शिक्षक आमदार ही विधासभेत प्रयत्न करत आहेत. शिक्षण मंत्र्यांनी नुकतेच २००५ पूर्वीच्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना १९८२ ची जुनी पेन्शन मिळावी यासाठी शासनातर्फे सकारात्मक म्हणणे सादर केले आहे असे म्हटले होते ते पत्र शासनाने कर्मचाऱ्यांना द्यावे यासाठी कोल्हापूर जिल्हा अधिकारी अमोल एडगे , माध्यमिक शिक्षणाधिकारी व शिक्षण उपसंचालकां जुनी पेन्शन संघर्ष समितीच्या वतीने निवेदन देण्यात आले.
निवेदनाचा आशय असा शिक्षण क्षेत्रामद्ये विनाअनुदानित शाळेत २००५ पूर्वी अनेक शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.शिक्षण विभाग व्यक्तिरिक्त सर्व आस्थापनातील कर्मचाऱ्यांना २००५ पूर्वी नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांना १९८२ ची जुनी पेन्शन योजना शासनाने लागू केली आहे. शिक्षण विभागात मात्र दुजाभाव करून २००५ पूर्वी नियुक्त असूनही शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना शंभर टक्के अनुदानाची आठ लागू करून जुन्या पेन्शन योजने पासून वंचित ठेवले आहे ही बाब अन्यायकारक असून शिक्षण विभागातील २६ हजार कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर बेघर करणारी आहे. सदरचे कर्मचारी चार सप्टेंबर व पाच सप्टेंबर (शिक्षकदिनी) २०२५ रोजी शाळा बंद आंदोलन करून आझाद मैदान मुंबई या ठिकाणी जलसमाधी आंदोलन करणार आहेत. याची दखल घेऊन शासनाने शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी.
२००५ पूर्वी विनाअनुदानित अंशतः अनुदानित कर्मचाऱ्यांपैकी मृत्यु झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन व सेवानिवृत्त उपदान शासन देत असतील तर हेच कर्मचारी सेवानिवृत्त झाल्यानंतर शासन यांना पेन्शन व सेवानिवृत्त उपदान देत नाहीत. याचा अर्थ असा की ह्या कर्मचाऱ्यांनी आत्महत्या कराव्यात मग आमचे शासन यांना पेन्शन व सेवानिवृत्त उपदान इत्यादी लाभ देणार का
जुनी पेंशन कोअर कमिटी चे राज्य उपाध्यक्ष सुदेश जाधव, मुख्याध्यापक संघाचे राज्य उपाध्यक्ष दत्तात्रय घुघरे ,निवास ताम्हणकर, कोल्हापूर जिल्हा शिक्षक पतपेढी चे चेअरमन जयसिंग पोवार, भाऊसाहेब खाडे,पृथ्वीराज पाटील, सातापा पाटील,प्रकाश देसाई,प्रकाश साडूगडे, राजेंद्र साळोखे,अनिल जाधव,अशोक पाटील,संजय पाटील, रघुनाथ सावंत,अंकुश पाटील एम एन पाटील ,श्रीधर चौगले,जयसिंग गुरव एम एस चव्हाण,आदीसह उपस्थीत होते.
Comments
Post a Comment