निवृत्ती पोलीस उपनिरीक्षकाची 17 लाखाची फसवणूक.
निवृत्ती पोलीस उपनिरीक्षकाची 17 लाखाची फसवणूक.
पोलिस अधिकारी तानाजी गुरव
--------------------------------------
जयसिंगपूर प्रतिनिधी
नामदेव भोसले
--------------------------------------
कोल्हापूर जिल्हा पोलीस प्रमुख यांच्याकडे केली तक्रार दाखल.
शिरोळ, हातकलंगले तालुक्यातील अनेकांना कोट्यावधी रुपयाचा गंडा.
तानाजी विष्णू गुरव रा. सुमन कॉम्प्लेक्स गल्ली नंबर 12 भाजी मंडई जयसिंगपूर ता. शिरोळ हे निवृत्त पोलीस उपनिरीक्षक आहेत. त्यांचे मित्र दिनकर दादोजी पाटील मुळगाव अर्दाळ ता. आजरा सध्या राहणार पुजारी मळा इचलकरंजी. यांनी एक लाखाला एक कोटी रुपयाचे अधिक आर्थिक लाभाचे आमिष दाखवून गुरव यांच्याकडून 17 लाख रुपये गुंतवणूक करून घेऊन फसवणूक केल्याचे जयसिंगपूर येथे तानाजी गुरव यांनी पत्रकार बैठकीत माहिती दिली आहे.
तसेच भारताचे सोने अमेरिकेमध्ये ठेवले आहे त्याचे मिळणारे व्याज व्यवसायाकरिता आपल्याला मिळणार असून सदर काम करून देणारे लोक माझ्याकडे आहेत त्यामध्ये तुम्ही ठेव म्हणून पैसे गुंतवले तर तुम्हाला एक लाख रुपयाला एक कोटी रुपये एका वर्षाला मिळणार आहेत असे सांगून उपनिरीक्षक तानाजी गुरव यांची दिनकर पाटील यांनी फसवणूक केले असल्याचे सांगितले . या फसवणुकीमध्ये मुंबई, अकलूज, बार्शी, तसेच रिझर्व बँकेचे निवृत्त कर्मचारी यांचा सहभाग असल्याचे तक्रारीत तानाजी गुरव यांनी म्हटले आहे. 17 लाख रुपये घेऊन ठरले प्रमाणे कमेंटमेंट चे पैसे आपल्या खात्यावर जमा होणार आहेत त्यामुळे तुम्ही कोणत्याही प्रकारची काळजी करू नका असे दिनकर पाटील यांनी सांगितले होते. या गोष्टीवर विश्वास ठेवून तानाजी गुरव यांनी त्यांच्याकडे 17 लाख रुपये गुंतवले होते. पैशाची मागणी केली असता अमेरिकेवरून रिझर्व बँकेमार्फत मनोज प्रधान यांच्या नावे असलेले 13 बँक खात्यावर पैसे जमा झाले आहेत पण सदरचे पैसे काढण्यासाठी परवानगी न दिलेने रक्कम काढता येणार नाही असे दिनकर पाटील यांनी सांगितले. वेळोवेळी यांच्याकडे संपर्क साधला असता पैसे देणार आहोत असे सांगत होते. शेवटी दिनकर पाटील यांनी तानाजी गुरव यांचा फोन उचलायचा बंद केला आहे. शेवटी पैसे मिळत नसल्याने या फसवणुकीतील संबंधित मनोज विजयकुमार प्रधान राहणार हनुमान रोड विलेपार्ले मुंबई, शिवानंद धोंडीराम खताळ राहणार अकलूज, महादेव अमोश्री सातपुते राहणार जामगाव बार्शी, दिनकर दादोजी पाटील राहणार इचलकरंजी यांची योग्य त चौकशी करून कारवाई होणे बाबत जिल्हा पोलीस प्रमुख कोल्हापूर यांच्याकडे तक्रारी अर्ज दिली असल्याचे निवृत्ती पोलीस उपनिरीक्षक तानाजी गुरव यांनी यावेळी सांगितले आहे.
Comments
Post a Comment