Header Ads

जिच्या मुळे आपण झालो सनाथ... त्या आईला कधी करू नका अनाथ ....प्रा.सुषमा पाटील.

 जिच्या मुळे आपण झालो सनाथ... त्या आईला कधी करू नका अनाथ ....प्रा.सुषमा पाटील.

----------------------------------

वारणानगर प्रतिनिधी 

किशोर जासूद

----------------------------------

जिच्या मुळे आपण सनाथ झालो त्या आईला कधी अनाथ करू नका..कारण आईने आपणास गर्भदान,प्राणदान, रक्तदान,अस्थिदान व लज्जादान अर्पण करून या जगात आणले त्या आईला कधीच अंतर देऊ नका असे प्रतिपादन कोल्हापूरच्या प्रा सुषमा पाटील यांनी केले. त्या येथील वर्षा व्याख्यानमालेत बोलत होत्या.

येथील श्री शारदा वाचन मंदिर आणि श्री तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी साखर कारखाना यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या वर्षा व्याख्यानमालेत

यावर्षी या वर्षा व्याख्यानमालेचे हे ४७ वे वर्ष असून तिसरे पुष्प गुंफताना " आई संस्काराचे विद्यापीठ " या विषयावर बोलताना प्रा पाटील पुढे म्हणाल्या की नव्या पिढीतील मुलांमध्ये आध्यात्मिक, बौद्धिक, भावनिक आणि मानसिक पातळीवरचे चांगले बदल घडवण्याची खरी ताकद आईच्या संस्कारात असल्याने आई हेच खरे संस्काराचे विद्यापीठ असल्याचे मत व्यक्त करत आजकालच्या प्रत्येक आईने शारीरिक सौंदर्यवाढीच्या पार्लरमध्ये जाण्यापेक्षा मनाचे सौंदर्य वाढवण्या-या पार्लरमध्ये जाण्याची आज गरज असल्याचे प्रतिपादन प्रा सुषमा पाटील यांनी केले... पाहुण्यांचा परिचय प्रा .राहूल देशमुख यांनी करून दिला.तर वक्त्या प्रा सुषमा पाटील यांचा सत्कार बहिरेवाडीच्या सरपंच प्रमिला जाधव यांच्या हस्ते झाला.

या कार्यक्रमास अरूण पाटील,प्रमोद कोरे,अनिल मोरे, बहिरेवाडीच्या माजी सरपंच उज्वला जाधव,जगन्नाथ चरापले,अनंत पाटील, शशिकांत कुलकर्णी, शिवाजी जंगम,के .जी जाधव, जयसिंग पाटील ,एम बी मलमे , रमाताई काशीद, आप्पासाहेब खोत, आदींसह वारणा समूहातील विविध संस्थांचे संचालक ,अधिकारी ,विद्यार्थी, शिक्षक ,महिला आदीसह रसिक श्रोते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार ग्रंथमित्र बाबासाहेब कावळे यांनी मानले.

......................................................................

फोटो ओळ : येथील वर्षा व्याख्यानमालेत बोलताना

वक्ते प्रा सुषमा पाटील.....

No comments:

Powered by Blogger.