गणेशोउत्सवाच्या पार्श्वभूमीवर कुपवाड एम .आय.डीसी पोलिसांनी 220 गुन्हेगारावर प्रतिबंधक कारवाई केली व 21 सराईत गुन्हेगारावर हद्दपार .. !

 गणेशोउत्सवाच्या पार्श्वभूमीवर कुपवाड एम .आय.डीसी पोलिसांनी 220 गुन्हेगारावर प्रतिबंधक कारवाई केली व 21 सराईत गुन्हेगारावर हद्दपार .. !

 -----------------------------------------

 मिरज तालुका  प्रतिनिधी 

राजू कदम

-----------------------------------------

राज्यामध्ये गणेशोत्सव हा मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येतो. सदर उत्सवाची तयारी सांगली जिल्हा पोलीस दल हे गेले २ महिन्यापासुन करत आहे. तरी मा. पोलीस अधिक्षक सो संदिप घुगे साहेब, अप्पर पोलीस अधिक्षक साो कल्पना बारवकर मॅडम, उपविभागीय पोलीस अधिकारी सो प्रणिल गिल्डा साहेब यांचे मार्गदर्शनाखाली एमआयडीसी कुपवाड पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी दिपक भांडवलकर यांनी नागरिकांच्या सुरक्षिततेसह शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी याकरीता खालील प्रमाणे उपाययोजना आखण्यात आल्या आहेत.


> एमआयडीसी कुपवाड पोलीस ठाणे अंतर्गत १७१ गणेश मंडळे आहेत. सर्व मंडळांना एक कॅमेरा पोलीसांसाठी व नशामुक्त अभियाना करीता प्रबोधन करण्यात आले आहे.


➤ सर्व गणेश मंडळांना मिरवणुका व देखावे बाबत योग्य त्या सुचना देण्यात आल्या आहेत. तसेच मंडळांना स्वयंसेवक नेमणेबाबत सुचना दिल्या आहेत.


▶ गणेशउत्सवाच्या अनुषंगाने हद्दीतील प्रमुख मार्गावरती असणारे सीसीटीव्ही कॅमेरे सुस्थितीत ठेवण्यात आले आहेत. महत्त्वाच्या मंडळा तसेच प्रमुख मार्गावर गस्ती पथक नेमण्यात आले आहे. सोसायटी चौक व आंबा चौक या ठिकाणी फिक्स पॉईट तयार करण्यात आले असुन त्या ठिकाणी योग्य पोलीस बंदोबस्त नेमण्यात आला आहे,


> पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे ३ पथके तयार करण्यात आली आहेत. ध्वनी मर्यादेचे काटेकोर पालन करण्यासाठी विशेष तपासणी पथक नेमण्यात आले असुन सदरचे पथकाकडून ध्वनी मर्यादचे पालन न करण्याऱ्या मंडळावर योग्य कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. महिलांची छेडछाड व मिरवणुकीमधील हुल्लडबाजी करणाऱ्यावरती योग्य ती कारवाई करण्याकरीता साध्या वेशातील महिला पोलीसांची विशेष तुकडी नेमण्यात आली आहे.


> गणेशउत्सव अनुषंगाने विसर्जन असणारे दिवशी स्वतंत्र वाहतुक मार्ग आखलेले आहेत. तसेच आपत्कालीन वाहनांना (रूग्णवाहीका /फायर ब्रिगेड) अडथळा होणार नाही याची विशेष काळजी घेतली आहे.


> कायदा व सुव्यवस्थे करीता पोलीस ठाणे मध्ये असणारे रेकॉर्ड वरील असणारे २२० गुन्हेगारांवर प्रतिबंधक कारवाई करण्यात आली आहे. त्यातील रेकॉर्डवर असणारे एकुण २१ गुन्हेगारावरती गणेश उत्सव काळामध्ये हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे.


> संभाव्य संवेदनशील भागामध्ये अतिरिक्त पोलीस बंदोबस्त नेमण्यात आला आहे.


> पोलीस ठाणे हद्दीमधील असणारे माजी सैनिक व निवृत्त पोलीस अधिकारी व अंमलदार यांची गणेशउत्सव काळामध्ये विशेष अधिकारी म्हणून नेमणुक करण्यात आली आहे.


▶ गणेश उत्सवकाळामध्ये शांतता समिती, मोहल्ला समिती, पोलीस मित्र यांचेशी स्थानिक पातळीवर योग्य तो समन्वय ठेवण्यात येत आहे.


एमआयडीसी पोलीस ठाणेकडून नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की, नागरिकांनी पोलीसांना सहकार्य करून कायदा व सुव्यवस्था राखावी, तसेच कोणतीही संशयास्पद हालचाल आढल्यास तात्काळ पोलीस ठाणेशी संपर्क साधा अशा सूचना करण्यात आल्या आहेत

Comments

Popular posts from this blog

गांधीनगरमध्ये दुकानदाराची ७.५१ लाखांची फसवणूक; दुकानातील कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल.

अनैतिक प्रेम संबंधातून शिवथर येथील विवाहित महिलेचा गळा कापून खून.

गणेश टॉकीज जवळ बुलेट ने ठोकर दिल्याने एका महिलेचा मृत्यू.तर दोघेजण जखमी.