गणेशोत्सव व ईदच्या पाश्वभूमीवर मुरगूड पोलिसांचे संचलन.
गणेशोत्सव व ईदच्या पाश्वभूमीवर मुरगूड पोलिसांचे संचलन.
----------------------------
मुरगूड प्रतिनिधी
जोतीराम कुंभार
----------------------------
आगामी गणेश चतुर्थी व ईद ए मिलाद सणांच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था रहावी यासाठी मुरगूड पोलिसांनी संपूर्ण शहरातून संचलन केले.
यावेळी मुरगूड एस. टी. परिसरामधे दंगल काबू योजना रंगीत तालीम घेण्यात आली.सदर संचलनामधे सपोनि शिवाजीराव करे यांच्या मार्गदर्शनाखाली सुमारे शंभर पोलिस व होमगार्ड सहभागी झाले होते.
यावेळी मुरगूड पोलिस ठाण्याकडून तुकाराम चौक, हनुमान मंदीर, अंबाबाई मंदीर, एस. टी. स्टॅड, जवाहर रोड व बाजार पेठ या भागातून पोलिसांनी ध्वनीक्षेपकावरून सूचना देत संचलन केले. यावेळी पोलिस उपनिरीक्षक प्रियांका वाकळे, सहाय्यक फौजदार, प्रशांत गोजारे यांच्यासह सर्व पोलिस कर्मचारी सहभागी झाले होते. तसेच यावेळी ग्रामीण रुग्णालयाकडील वैद्यकीय अधिकारी व ॲम्बूलन्स पथक, मुरगूड नगरपरिषद कार्यालयाकडील अग्निशामक दल पथक उपलब्ध करून ठेवण्यात आलेले होते.
No comments: