प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीसपदी नंदकुमार कुंभार यांची फेरनिवड.
प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीसपदी नंदकुमार कुंभार यांची फेरनिवड.
-------------------------------
इस्लामपूर प्रतिनिधी
ज्योती कुंभार.
-------------------------------
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीस पदी नंदकुमार कुंभार यांची फेर निवड करण्यात आली. या निवडी भारतीय काँग्रेस पक्षाचे मुख्य सरचिटणीस खासदार के. सी. वेणुगोपाल यांनी जाहीर केले आहेत.
खासदार के.सी. वेणुगोपाल म्हणाले , पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाची बांधणी करत सामाजिक बांधिलकी जपण्याचे काम करावे लागणार आहे. समाजाची कामे एक निष्ठेने करत काँग्रेस पक्षाचे विचार सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचून राहणीमान उंचावण्यासाठी काम करावे.
काँग्रेस पक्षाचे काम प्रामाणिक व निष्ठेने करणार आहे काँग्रेस पक्ष आघाडी बरोबर संघटन करण्यावर भर देण्यात येणार आहे. काँग्रेस पक्षाच्या संघटनात्मक रचनेचे नव्याने बळकटीकरण सुरू करणार आहे. महाराष्ट्रातील पारंपरिक बारा बलुतेदार समाज, इतर मागासवर्गीय घटकांच्या सामाजिक उन्नतीसाठी ठोस उपक्रम राबविण्यात येणार आहेत. तरुणाईसाठी नेतृत्व-विकास आणि सशक्तीकरणाचे धोरणात्मक प्रयत्न करावे लागणार आहेत. ग्रामीण भागांपर्यंत काँग्रेस पक्षाच्या लोकशाही विचारांचा आणि संविधानिक मूल्यांचा प्रभावी प्रसार करण्याची गरज आहे. “कार्य हीच पूजा” या विचाराने प्रेरित होऊन, जबाबदारीच्या कार्यभाराकडे सेवाभाव, सच्चरित्रता आणि निर्भयतेने वाटचाल करण्यात येत असल्याचे नूतन सरचिटणीस नंदकुमार कुंभार यांनी सांगितले.
सांगली जिल्हा
Comments
Post a Comment