आज आ. चिखलीकर यांच्या वाढदिवसानिमित्त भरगच्च कार्यक्रम.

 आज आ. चिखलीकर यांच्या वाढदिवसानिमित्त भरगच्च कार्यक्रम.

-----------------------------

नांदेड प्रतिनिधी

अंबादास पवार 

-----------------------------

 लोहा कंधार विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा नांदेड लोकसभेचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या वाढदिवसानिमित्त याहीवर्षी भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. नांदेडसह लोहा, कंधार, नायगाव, भोकर, अर्धापूर आदी ठिकाणी विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.


आज दि. १ ऑगस्ट रोजी सकाळी ८.३० वाजता प्रभू पाटील कपाटे आणि प्रल्हाद उमाटे यांच्या पुढाकारातून हनुमानगड नांदेड येथे आरती व दर्शनाचा कार्यक्रम पार पडणार आहे. त्यानंतर सकाळी ९ वाजता आ. चिखलीकर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून जयंतीनिमित्त अभिवादन करणार आहेत. त्यानंतर बालाजी मंदिर, कौठा येथे उद्धवराव बसवदे यांच्या पुढाकारातून आरती व दर्शन, दिलीप कंदकुर्ते यांच्या वतीने आयोजित साईबाबा मंदिर कौठा येथे आरती, स. बल्लूसिंग शाहू यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या तख्त सचखंड श्री हजुर साहिब गुरूद्वारा येथे १०.३० वाजता दर्शन, सकाळी ११.१५ वाजता आ. बोंढारकर यांच्या अभीष्टचिंतन सोहळ्यास आ. चिखलीकर उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर दुपारी १२ वाजता बियाणी पार्क कौठा येथे शिवकुमार मंगनाळे यांच्या निवासस्थानी भेट. दुपारी १२.३० वाजता पंजाबराव काळे यांच्या वतीने स्वागत. त्यानंतर सिडको येथे माधवराव लोंढे यांच्या निवासस्थानी भेट. संग्राम मोरे यांच्या पुढाकारातून बालाजी मंदिर हडको येथे दर्शन. साईबाबा मंदिर साईनगर, धनगरवाडी, जानापुरी येथे बळीराम पाटील आणि माधव पाटील यांच्या वतीने सत्कार. दुपारी ३.३० वाजता शिवराज तांबोळी यांच्या पुढाकारातून वडेपुरी रत्नेश्वरी देवी मंदिर येथे अभिषेक, आरती आणि महाप्रसाद. सायंकाळी ४.४५ वाजता दत्ता वाले यांच्या पुढाकारातून लोहा येथे कै. बाळाजी पवार मंगल कार्यालयात स्वागत सोहळा आणि याचवेळी ह.भ.प. निवृत्ती महाराज इंदोरीकर यांचा कीर्तन सोहळा. त्यानंतर सायंकाळी ७.३० वाजता बैलबाजार मैदान, तहसील रोड उमरी येथे अमोल पाटील ढगे यांच्या वतीने आयोजित ह.भ.प. इंदोरीकर महाराज यांचा कीर्तन सोहळा पार पडणार आहे. या सर्व कार्यक्रमांना उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजकांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

अनैतिक प्रेम संबंधातून शिवथर येथील विवाहित महिलेचा गळा कापून खून.

गणेश टॉकीज जवळ बुलेट ने ठोकर दिल्याने एका महिलेचा मृत्यू.तर दोघेजण जखमी.

तुरंबे येथील तेरा वर्षाची युवती चे प्रेत विहिरी सापडले.