प्रा. डॉ. एन. डी. पाटील महाविद्यालयात ऑगस्ट क्रांतीदिन साजरा.
प्रा. डॉ. एन. डी. पाटील महाविद्यालयात ऑगस्ट क्रांतीदिन साजरा.
----------------------------
मलकापूर प्रतिनिधी
रोहित पास्ते
----------------------------
प्रा. डॉ.एन.डी.पाटील महाविद्यालयातील इतिहास विभागाच्या वतीने ऑगस्ट क्रांतीदिना निमित्त व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. तत्पूर्वी भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतिकारक, जेष्ठ नेते, स्वातंत्र्य सैनिक यावर आधारित विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या भित्तिपत्रिकेचे उद्घाटन डॉ. अंकुश बेलवटकर यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.
कार्यक्रमाचे प्रमुख व्याख्याते मा. डॉ. अंकुश बेलवटकर यांनी भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील विविध घटनांचा आढावा घेत ऑगस्ट क्रांती दिनाचे महत्त्व स्पष्ट केले. 'सन १९४२ मध्ये महात्मा गांधीजींनी ०८ ऑगस्ट रोजी भारत छोडो आंदोलनाची हाक दिली. मुंबईच्या गवालीया टॅंक मैदानावरून आरंभ झालेल्या या आंदोलनाने ब्रिटिश सत्तेला हादरवून सोडल. 'करा किंवा मरा' या गांधीजींच्या घोषणेने प्रत्येक भारतीयांच्या मनात स्वातंत्र्याची ज्योत पेटवली.'
अध्यक्षीय मनोगतात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.पी.जी. पवार यांनी स्वातंत्र्य सैनिकांच्या योगदानाला उजाळा दिला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक इतिहास विभाग प्रमुख डॉ. चंद्रकांत गिरी यांनी केले. प्रो. डॉ. एस. पी. बनसोडे यांनी आभार तर प्रा. आकाश चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले. सदर कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर सेवक व विद्यार्थी उपस्थित होते.
Comments
Post a Comment