शाश्वत शेती दिनानिमित्त विरळे येथे सेंद्रिय शेतीचा जागर
शाश्वत शेती दिनानिमित्त विरळे येथे सेंद्रिय शेतीचा जागर.
-------------------------------
मलकापूर प्रतिनिधी
रोहित पास्ते
-------------------------------
भारतरत्न डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांच्या जन्मशताब्दीनिमित्त ‘शाश्वत शेती दिन’ साजरा करण्यात आला. या निमित्ताने विरळे येथे आयोजित कार्यक्रमात मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी सहभाग घेतला.
कार्यक्रमामध्ये सेंद्रिय शेतीचे महत्त्व विषद करण्यात आले. रासायनिक खतांऐवजी सेंद्रिय खते वापरण्याचे फायदे स्पष्ट करण्यात आले. शेतकऱ्यांना सेंद्रिय खत बनवण्याचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक दाखवून मार्गदर्शन करण्यात आले.
या वेळी उपस्थित मान्यवरांमध्ये माजी सरपंच मा. कृष्णा पाटील, विद्यमान सरपंच मा. सुरेश पाटील, महादेव इंदुलकर, राजाराम पाटील, रामचंद्र पाटील, संदीप गायकवाड, कृष्णा नाकटे, नामदेव पाटील, अशोक पाटील, सचिन कांबळे यांचा समावेश होता. तसेच कृषी अधिकारी विजय मेमाणे व शाहूवाडी तालुका कृषी अधिकारी यांचीही उपस्थिती होती.
या उपक्रमामुळे शेतकऱ्यांमध्ये सेंद्रिय शेतीबद्दल जागरुकता वाढली असून, भविष्यात पर्यावरणपूरक शेतीकडे वळण्याचा निर्धार अनेकांनी व्यक्त केला.
No comments: