कोरगांवकर हायस्कूलमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात.
कोरगांवकर हायस्कूलमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात.
----------------------------------
बच्चे सावर्डे प्रतिनिधी
सुनिल पाटील
----------------------------------
कोल्हापूर : सदर बाजार येथील आंतरभारती शिक्षण मंडळ संचलित कोरगांवकर हायस्कूलमध्ये स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला . यावेळी स्वातंत्र्य चळवळीत अग्रणी असणारे क्रांतिवीर स्वर्गीय दत्तोबा तांबट यांचे बाळकडू अंगी बाणलेले त्यांचे पुत्र प्रभाकर तांबट यांचे हस्ते ध्वजारोहण पार पडले . यावेळी मुख्याध्यापक संजय सौंदलगे यांनी प्रास्ताविक आणि पाहुण्यांचे स्वागत केले . आपल्या संदेशपर भाषणात प्रभाकर तांबट यांनी क्रांतीवीरांच्या संघर्षगाथेबरोबरच त्यांच्या विचारांचा वारसा जपण्याचे विद्यार्थ्यांना आवाहन केले . राष्ट्रसेवादल विचारसरणीचा पगडा आपल्या मनावर बालपणीच बिंबल्याने सेवादलाचे बाबुराव मुळीक, शाम पटवर्धन, चंद्रकांत पाटगांवकर आदी मान्यवर विभुतींकडून खूप काही शिकावयास मिळाल्याचेही त्यांनी नमूद केले . प्रभाकरपंत कोरगांवकर यांच्यासारख्या सेवाभावी व्रतस्थामुळेआपले शिक्षण झाल्याचे नम्रपणे सांगितले . हेमलता पाटील यांनी विद्यार्थ्यांकडून संविधान आचरणाची शपथ घेतली . सरीता शिंदे यांनी राष्ट्रगीत, झेंडागीत तसेच राज्यगीताचे सामूहिक गायन केले . आर. एस. पी. च्या विद्यार्थ्यांनी पाहुण्यांना मानवंदना दिली . पर्यवेक्षिका सुरेखा पोवार आणि सदाशिव -हाटवळ यांनी कवायत संचलनाचे सुंदर संयोजन करून वातावरण निर्मिती केली . बाबासाहेब डोणे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला . तृप्ती रावराणे यांनी सूत्रसंचालन केले तर राजाराम संकपाळ यांनी आभार प्रदर्शन केले . यावेळी सारिका ढेरे, शंकर कामत, मानसिंग हातकर, सुनील साजणे, प्रसाद रेळेकर, नागेश हंकारे, सुमेश रामटेके, सुभाष बेलवळेकर आदी मान्यवर उपस्थित होते .
Comments
Post a Comment