कुंभोज ग्रामपंचायतीच्या वतीने आयोजित ध्वजारोहण, 'हर घर तिरंगा' रॅली आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या ७५०व्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम.
कुंभोज ग्रामपंचायतीच्या वतीने आयोजित ध्वजारोहण, 'हर घर तिरंगा' रॅली आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या ७५०व्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम.
---------------------------
कुंभोज प्रतिनिधी
विनोद शिंगे
---------------------------
कुंभोज (ता. हातकणंगले) : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या ७५०व्या जयंतीनिमित्त कुंभोज ग्रामपंचायतीच्या वतीने दिनांक १५ ऑगस्ट रोजी ध्वजारोहण सोहळा, 'हर घर तिरंगा' रॅली तसेच विविध सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
ग्रामपंचायतीच्या कार्यालयासमोर सरपंच सौ. जयश्री महापुरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी उपसरपंच आप्पासाहेब पाटील ग्रामसेवक सुषमा कांबळे, जवाहर कारखाना व्हाईस चेअरमन बाबासाहेब चौगुले ग्रामपंचायत सदस्य, महिला बचत गटाच्या अध्यक्षा व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
'हर घर तिरंगा' रॅली उत्साहात पार
स्वातंत्र्य दिनानिमित्त 'हर घर तिरंगा' मोहिमेअंतर्गत विद्यार्थ्यांनी, युवकांनी व ग्रामस्थांनी एकत्र येत कुंभोज गावातून देशभक्तीपर घोषणांसह भव्य रॅली काढली. शाळेच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तिपर गीते सादर करत वातावरण राष्ट्रप्रेमाने भारून टाकले.
संत ज्ञानेश्वर महाराजांच्या ७५०व्या जयंतीनिमित्त विशेष कार्यक्रम
या दिवशी संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या ७५०व्या जयंतीनिमित्त ग्रामपंचायतीच्या वतीने त्यांच्या जीवनकार्यावर आधारित व्याख्यान, अभंगवाणी सादरीकरण व कीर्तनाचा कार्यक्रम पार पडला. सुप्रसिद्ध कीर्तनकार शाहिर बाळासाहेब लाटवडे यांच्या मार्गदर्शनाखाली संतांच्या विचारांची प्रेरणा ग्रामस्थांपर्यंत पोहोचवण्यात आली.
कार्यक्रमाचे संयोजन ग्रामपंचायत सदस्यांनी आणि स्थानिक युवक मंडळांनी मिळून उत्कृष्टपणे पार पाडले. यामुळे गावात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.विनोद शिंगे कुंभोज
Comments
Post a Comment