पेठ वडगाव : आमदार चषक महायुती दहीहंडी उत्सव उत्साहात संपन्न.

 पेठ वडगाव : आमदार चषक महायुती दहीहंडी उत्सव उत्साहात संपन्न.

पेठ वडगाव (ता. हातकणंगले) येथे नगरपालिका चौकात आमदार दलितमित्र डॉ. अशोकराव माने (बापू) प्रेमी आयोजित आमदार चषक महायुती दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात व भव्यदिव्य वातावरणात पार पडला. परंपरा, उत्साह आणि तरुणाईचा जल्लोष यांचा संगम घडवणारा हा सोहळा पेठ वडगावच्या इतिहासात एक अविस्मरणीय पर्व ठरला.


या उत्सवाला हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. अशोकराव माने (बापू), जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित दादा कदम, भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष व माजी आमदार सुरेश हाळवणकर, जिल्हा बँकेचे संचालक विजयसिंह माने, माजी जि.प. सदस्य अरुण इंगवले, माजी नगराध्यक्ष मोहनलाल माळी, पोलीस निरीक्षक प्रमोद शिंदे, गटनेते अजय थोरात, उद्योगपती संदीप कारंडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. त्यांच्या प्रेरणादायी मार्गदर्शनामुळे वातावरणात नवचेतना निर्माण झाली.


मराठी चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेत्री तेजा देवकर, तेजल शिंदे, तसेच लोकप्रिय रिलस्टार प्रतीक्षा सूर्यवंशी, कार्टून आन्या, सिद्धू व रवी दाजी यांच्यासह अनेक कलाकारांनी हजेरी लावून सोहळ्याची शोभा वाढवली.


नृसिंह गोविंदा पथक, जय महाराष्ट्र गोविंदा पथक, गोडीविहीर गोविंदा पथक आदी दमदार पथकांनी सहा-सात थराचे सादरीकरण करून प्रेक्षकांची दाद मिळवली. अखेर उत्कंठावर्धक स्पर्धेत शिरोळचे जय महाराष्ट्र गोविंदा पथक विजयी ठरले आणि तब्बल ₹2,51,000/- चे मानकरीपद पटकावत विजयी मान मिळवला.


"दहीहंडी फोडणे म्हणजे केवळ माखनहंडी फोडणे नव्हे; तरुणाईच्या जोशाला दिशा देणे, ऐक्याची ताकद दाखवणे आणि परंपरेशी निष्ठा राखणे हा त्यामागचा खरा संदेश आहे," असे आमदार डॉ. माने (बापू) यांनी यावेळी सांगितले.


या सोहळ्याच्या यशस्वी आयोजनाबद्दल मान्यवर, कलाकार, स्पर्धक पथकं व नागरिक यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले.

(प्रतिनिधी – किशोर जासूद) ✅

Comments

Popular posts from this blog

गांधीनगरमध्ये दुकानदाराची ७.५१ लाखांची फसवणूक; दुकानातील कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल.

अनैतिक प्रेम संबंधातून शिवथर येथील विवाहित महिलेचा गळा कापून खून.

गणेश टॉकीज जवळ बुलेट ने ठोकर दिल्याने एका महिलेचा मृत्यू.तर दोघेजण जखमी.