मालवे येथील एकास काठीने मारहाण केल्याप्रमाणे चार जणांच्या विरोध गुन्हा दाखल.
मालवे येथील एकास काठीने मारहाण केल्याप्रमाणे चार जणांच्या विरोध गुन्हा दाखल.
------------------------------
राधानगरी प्रतिनिधी
विजय बकरे
------------------------------
राधानगरी तालुक्यातील मालवे येथील एकास किरकोळकरणावरून काठीने मारहाण करून गंभीर जखमी केल्या प्रकरणी राधानगरी पोलिसांनी चौघा विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती राधानगरी पोलिसांनी दिली
याबाबत अधिक माहिती आशिकी मालवे तालुका राधानगरी येथील आशिष अंकुश देवर्डेकर वर्षे 25 त्याचा भाऊ ओमकार असे दोघे सरवडे येथे साऊंड ट्रायल पाहण्यासाठी गेले होते त्यावेळी आशिष देवर्डेकर याच्या ओळखीचे विनायक अंगज, आदर्श बैलकर, प्रज्वल देवर्डेकर, मंगेश गावडे तुरुंबे हे चौघेजण सरवडे साउंड ट्रायल पाहण्यासाठी आले होते त्यानंतर साऊंड ट्रायल पाहत असताना आशिष देवर्डेकर बरोबर विनायक अंगच, आदर्श बैलकर, प्रज्वल देवर्डेकर, मंगेश गावडे यांच्याबरोबर शाब्दिक बाचा बाच झाली होती साउंड ट्रायल संपल्यानंतर आशिष देवर्डेकर हे आपली मोटरसायकल घेऊन मालवे गावी जात असताना दैवत राईस मिल जवळ आला असताना विनायक अंगच याने आशिष ची मोटरसायकल आडवून आशिष याची कॉलर धरून ओढून हातातील काठी ने डोक्यात मारहाण करून जखमी केले त्यानंतर आदर्श बैलकर, प्रज्वल देवर्डेकर, मंगेश गावडे या तिघांनी लाथा बुक्क्याने मारहाण करून जखमी केले या प्रकरणी राधानगरी पोलीस स्टेशनला आशिष देवर्डे कर यांनी दिल्यावर राधानगरी पोलिसांनी चौघा विरुद्ध गुन्हा दाखल केला असून अधिक तपास राधानगरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष गोरे यांच्या मार्गदर्शकाखाली हेड कॉन्स्टेबल शेळके व निकाडे हे करत आहेत
Comments
Post a Comment