बच्चे सावर्डे बंधाऱ्याजवळील रस्ता खचला.
बच्चे सावर्डे बंधाऱ्याजवळील रस्ता खचला.
-----------------------------------------
बच्चे सावर्डे प्रतिनिधी
सुनिल पाटील
-----------------------------------------
सावर्डे-मांगले दरम्यान असणाऱ्या कोल्हापूर-सांगली जिल्ह्यांना जोडणाऱ्या बंधाऱ्यावर रस्त्याचा भराव खचल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी धोकादायक बनला आहे. या मार्गाची तत्काळ दुरुस्ती करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे. वारणा नदीवर बच्चे सावर्डे-मांगले दरम्यान कोल्हापूर पद्धतीचा बंधारा आहे. वारणा नदीला आलेल्या पुरात सावर्डे बंधारा व बाजूचा रस्ता पाण्याखाली होता. बंधाऱ्यावरील पुराचे पाणी कमी झाल्यानंतर बच्चे सावर्डेकडील रस्त्याचा पूर्ण भराव खचल्याचे दिसून आले.
Comments
Post a Comment