Header Ads

श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर चे संकल्पक, संस्थापक शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांची ३८ वी पुण्यतिथी भावपूर्ण वातावरणात साजरी.

 श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर चे संकल्पक, संस्थापक  शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांची ३८ वी पुण्यतिथी भावपूर्ण वातावरणात साजरी.

 राजेंद्र हायस्कूल अंबप येथे आज  शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांची ३८ वी पुण्यतिथी  भक्तिभावाने व श्रद्धेने साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाची सुरुवात बापूजींच्या प्रतिमेचे पूजन माननीय मुख्याध्यापक श्री बी डी केकेरे सर यांच्या हस्ते करण्यात आले.


यानंतर डॉ. बापूजी साळुंखे यांच्या प्रतिमेची सजविलेल्या ट्रॅक्टर मधून सवाद्य गावफेरी काढून  अभिवादन करण्यात आले. यावेळी विद्यालयाचे  शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष डॉ. बी  के पाटील उपस्थित होते उपक्रमात इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून त्यांना सहकार्य केले.


कार्यक्रमात *श्री करवडे बी जी सर यांनी डॉ. बापूजी साळुंखे यांच्या जीवनकार्यावर मनोगत व्यक्त केले, तर विद्यार्थिनी वैष्णवी कदम हिने बापूजींच्या कार्याची थोडक्यात महती सर्वांसमोर मांडली.


कार्यक्रमाचे नियोजन  सांस्कृतिक विभाग प्रमुख सौ बी.एस .पाटील व इतर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अत्यंत नेटकेपणाने पार पाडले. ट्रॅक्टर साठी मदत करणारा विद्यार्थी सोहम माळी याचा सत्कार माननीय मुख्याध्यापक केकरे सर यांच्या हस्ते करण्यात आला.


कार्यक्रमास शाळेतील सर्व विद्यार्थी, शिक्षकवृंद, व शिक्षकेतर कर्मचारी  उपस्थित होते. डॉ. बापूजी साळुंखे यांच्याविषयीची निष्ठा, आदर आणि कृतज्ञता व्यक्त करणारा हा कार्यक्रम संस्मरणीय ठरला.

No comments:

Powered by Blogger.