उर्मी फाउंडेशन व एफिनिटी एक्स या कंपनीकडून तालुक्यातील 57 शाळेतील 2314 विद्यार्थ्यांना रेनकोट व खाऊ वाटप.
उर्मी फाउंडेशन व एफिनिटी एक्स या कंपनीकडून तालुक्यातील 57 शाळेतील 2314 विद्यार्थ्यांना रेनकोट व खाऊ वाटप.
--------------------------------
राधानगरी प्रतिनिधी
विजय बकरे
--------------------------------
उर्मी फाउंडेशन व एफीनिटी एक्स या कंपनीकडून विद्यार्थ्यांच्या शिक्षणातील अडथळे दूर करण्याच्या उद्देशाने राधानगरी तालुक्यातील पाच दुर्गम तसेच अतिवृष्टी प्रवण केंद्रातील 57 शाळेतील 2314 विद्यार्थ्यांना रेनकोट व खाऊ वाटप असा कार्यक्रम नुकताच घेण्यात आला
राधानगरी तालुक्यातील राधानगरी केळोशी धामोड सावरदे दुर्गमांनवड खामकरवाडी तळगाव इत्यादी अशा 57 शाळेतील 2314 विद्यार्थ्यांना रेनकोट व खाऊ वाटप राधानगरी पंचायत समितीचे गटशिक्षण अधिकारी धनंजय मेगाणे एफि नीटी एक्स कंपनीचे प्रतिनिधी स्वप्निल खोत शिवतेज गायकवाड उर्मी फौंडेशनचे आदिनाथ दरवडे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले
या कार्यक्रमास जिल्हा समन्वयक बाबुराव पाटील राधानगरी केंद्राचे केंद्रप्रमुख प्रकाश कानकेकर धामोड केंद्रप्रमुख के एच टिपकु ले सावदे केंद्राचे केंद्रप्रमुख डीजी पाटील दुर्गमांनवाड केंद्राचे केंद्रप्रमुख एकनाथ कांबळे तानाजी पाटील बीके पाटील खामकरवाडी शाळेचे मुख्याध्यापक कृष्णात टिपूगडे सावर्दे शाळेचे मुख्याध्यापक श्रीमती कडव तळगाव केंद्र मुख्याध्यापक श्री पाटील मुख्याध्यापक अशोक मोरे आर के पाटील सर्जेराव जाधव अजित सुतार संयोगिता पाटील नीलम जाधववर राणी लाड इत्यादी शिक्षक हजर होते
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अजित सुतार व आभार आर के पाटील यांनी मानले
Comments
Post a Comment