नैतिकतेचे शिक्षण आयुष्यभर उपयोगी पडते - प्रा. शारदा पाटील.
नैतिकतेचे शिक्षण आयुष्यभर उपयोगी पडते - प्रा. शारदा पाटील.
----------------------------------
गारगोटी प्रतिनिधी
स्वरूपा खटकर
----------------------------------
नैतिकतेचे शिक्षण आयुष्यभर उपयोगी पडते. व्यसनाधीन व्यक्तीची कौटुंबिक प्रगती थांबते.व्यसमुक्त समाज निर्मिती ही काळाची गरज आहे.असे प्रतिपादन
प्रा. शारदा पाटील यांनी केले. कर्मवीर विद्यालय चिमणे ता.आजरा येथिल संस्कार शिबिरात प्रमुख मार्गदर्शक म्हणून त्या बोलत होत्या. मुख्याध्यापक आय.एस.मुल्ला अध्यक्षस्थानी होते. प्रास्ताविक स्वागत संजय खोचारे यांनी केले. यावेळी प्रा.शारदा पाटील यांनी शालेय विद्यार्थ्यांना व्यसनाधीनतेचे दुष्परिणाम समजून सांगितले . यावेळी एस.एस.प्रभू, एकनाथ पाटील, एस.एस.मुल्ला,आसावरी जाधव, शालन पाटील,सिध्दांत सुपल , संतोष पटले,नंदकुमार कांबळे यांचेसह विद्यार्थी उपस्थित होते. संजय खोचारे यांनी आभार मानले.
फोटो ओळ- कर्मवीर विद्यालय चिमणे ता.आजरा येथे संस्कार शिबिरात बोलताना प्रा.शारदा पाटील.
No comments: