सरकारी पदावर असलेल्या मंडळ अधिकाऱ्याची ‘श्रीरंग ये’ निर्मितीवर प्रश्नचिन्ह; निधीसंदर्भात नागरिकांतून संशयाची चर्चा.
सरकारी पदावर असलेल्या मंडळ अधिकाऱ्याची ‘श्रीरंग ये’ निर्मितीवर प्रश्नचिन्ह; निधीसंदर्भात नागरिकांतून संशयाची चर्चा.
---------------------------------
शिरोळ प्रतिनिधी
नामदेव भोसले
---------------------------------
महसूल विभागातील मंडळ अधिकारी अविनाश सूर्यवंशी यांनी ‘रंगी रंगला श्रीरंग ये’ या नावाने महाराष्ट्रात सुमारे २४ ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केल्याची माहिती असून, या कार्यक्रमाची स्वतः निर्मिती केल्याचे बोलले जात आहे. यासंदर्भात स्पॉन्सरशिप व निधी संकलनाच्या पारदर्शकतेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.शासकीय अधिकाऱ्यांचा व्यावसायिक सहभाग नियमबाह्य?सद्य शासकीय सेवासंहितेनुसार, कोणताही सरकारी कर्मचारी स्वतःच्या नावे व्यावसायिक कार्यक्रम, इव्हेंट कंपनी किंवा स्पॉन्सरशिपच्या माध्यमातून उपक्रम चालवू शकत नाही. या नियमांचे उल्लंघन झाल्यास, त्याविरोधात शिस्तभंगात्मक कारवाईची तरतूद आहे.मात्र मंडळ अधिकारी अविनाश सूर्यवंशी यांनी "श्रीरंग ये" कार्यक्रमात निर्माता म्हणून सहभाग घेतल्याची माहिती प्रसिद्ध माध्यमांमधून समोर येत आहे.निधी संदर्भात गंभीर चर्चा:स्थानिक नागरीकांतून चर्चा आहे की, या कार्यक्रमांसाठी लागणारा निधी शिरोळ व परिसरातील काही माती उत्खनन करणाऱ्या व्यक्तींनी लाच स्वरुपात दिला, असा संशय व्यक्त होत आहे. यामध्ये बिनपरवाना व अवैध माती उत्खनन करणाऱ्या ठेकेदारांचा समावेश असल्याचे बोलले जात आहे.
सामाजिक संस्थांकडून चौकशीची मागणी या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार व स्थानिक नागरीकांनी याबाबत महसूल आयुक्त, जिल्हाधिकारी व लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (ACB) चौकशीची मागणी केली आहे.प्रश्न उपस्थित राहतात:शासकीय पदावर कार्यरत असलेला अधिकारी व्यावसायिक निर्मिती कशी करू शकतो?निधीचा स्रोत स्पष्ट का नाही?संबंधित कार्यक्रमात वापरलेली स्पॉन्सरशिप पारदर्शक आहे का?माती उत्खनन प्रकरणाशी आर्थिक संबंध आहेत का?
Comments
Post a Comment