जयसिंगपुरात डॉ. बाबासाहेबांचा पूर्णाकृती पुतळा आणि भव्य भिमसृष्टी लवकरच साकारणार आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर.

 जयसिंगपुरात डॉ. बाबासाहेबांचा पूर्णाकृती पुतळा आणि भव्य भिमसृष्टी लवकरच साकारणार आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर.

-------------------------------

जयसिंगपूर प्रतिनिधी

-------------------------------

विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पांचा त्यांच्या लौकिकास साजेसा असा पूर्णाकृती पुतळा व त्यांच्या कार्याची ओळख करून देणारी भव्य भीमसारी जयसिंगपूर शहरात लवकरच साकारत असून जयसिंगपूर नगरपरिषदेच्या माध्यमातून उभे राहणारे डॉ. बाबासाहेबांचे हे भव्य स्मारक नव्या पिढीला मार्गदर्शक आणि प्रेरणा देणारे ठरेल अशी माहिती आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर व जयसिंगपूर नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी तथा प्रशासकीय अधिकारी श्रीमती टीना गवळी योनी संयुक्त पत्रकार परिषदेमध्ये दिली. 2019 च्या विधानसभेच्या निवडणुकीला सामोरे जाताना शिरोळ तालुक्यात छत्रपती शिवाजी महाराज आणि विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य पूर्णाकृती पुतळे जयसिंगपूर शहरामध्ये उभारणार अशी ग्वाही मी शिरोळच्या जनतेला दिली होती असे सांगताना यड्रावकर म्हणाले सध्या उभारण्यात आलेल्या शिवतीर्थाच्या जागेवर छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर बौद्ध संस्कार केंद्राच्या परिसरात डॉक्टर बाबासाहेबांचा पुतळा उभारण्याचे निश्चित केले होते, शिवतीर्थची जागा राज्य शासनाची होती आणि मी मंत्रिमंडळात सदस्य होतो त्यामुळे सदरची जागा विना मोबदला जयसिंगपूर नगरपरिषदेकडे सुपूर्त करण्याचा ठराव कॅबिनेटच्या बैठकीमध्ये मंजूर करून जवळपास तीन कोटी रुपये किमतीची जागा आपणास मोफत मिळवता आली आणि त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या कामाला खऱ्या अर्थान गती आली आणि ते काम पूर्ण झाले, मात्र डॉ. बाबासाहेब आंबेडकर बौद्ध संस्कार केंद्राच्या परिसरात डॉक्टर बाबासाहेबांचा पुतळा उभारण्यास मत मतांतरे झाली आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा शहराच्या क्रांती चौक परिसरामध्ये व्हावा अशी मागणी काही भीमसैनिकानी केली, यासाठी क्रांती चौक परिसरात असलेल्या बस स्थानकाच्या जवळ शिरोळ नृसिंहवाडी रोड लगत सर्वे नंबर 1266 मध्ये पुतळा उभारण्यासंदर्भात चर्चा झाली आणि अगदी आठवडाभरातच तत्कालीन मुख्यमंत्री नामदार एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्या आदेशाने एसटी महामंडळाच्या ताब्यात असणारी जागा जयसिंगपूर नगरपरिषदेकडे पुतळा उभारण्यासाठी वर्ग करण्यात आली, पण याही ठिकाणी पुतळा उभारण्यास काहींनी आक्षेप घेतला, पुतळा उभारण्यासाठी अपेक्षित असलेली 1251 ची जागा न्यायालयाच्या वहिवाटीस असून त्यांच्या ताब्यात होती व आजही आहे शिवाय मा.जिल्हा सत्र न्यायाधीश यांनी सदरची जागा न्यायालयाच्या विस्तारीकरणासाठी आम्हाला हवी आहे, असे लेखी पत्र मा. जिल्हाधिकारी कोल्हापूर यांना दिले होते. तसेच वरिष्ठ न्यायालयाकडेही अशीच मागणी जयसिंगपूर न्यायालयाने केली होती. न्यायालयीन इमारत असलेली ही जागा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा


उभारण्यासाठी मिळावी यासाठी कोल्हापूर जिल्हाधिकारी यांची आम्ही आंबेडकरवादी चळवळीतील पदाधिकाऱ्यां सोबत भेट घेतली. सदरची जागा जिल्हा न्यायालयाच्या वहिवाटी मध्ये असल्याने सदरची जागा देता येणार नाही असे लेखी पत्र मा. जिल्हाधिकारी कोल्हापूर यांनी आमच्या शिष्टमंडळाला दिले, त्यानंतर संजय पाटील


यड्रावकर व आंबेडकरवादी चळवळीतील शिष्टमंडळाने मुंबई उच्च न्यायालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी या जागेबाबत भेट घेतली असता त्यांनी देखील न्यायालयाची ही जागा देता येणार नाही अशी स्पष्ट भूमिका मांडली. या पार्श्वभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा बसविण्या विषयी आणखी किती वर्ष लागतील याचा कालावधी निश्चित होत नाही, न्यायालयीन प्रक्रियेमुळे पुतळा उभारणीचे काम अनेक वर्ष रखडले जाईल म्हणून पुतळा लवकर उभारण्यात यावा याकरिता लोकप्रतिनिधी व तालुक्यातील भीमसैनिकांच्या शिष्टमंडळांनी माझी भेट घेतली जयसिंगपूर शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा व्हावा ही आंबेडकर प्रेमी जनतेची तीस वर्षापासूनची असलेली मागणी आपण पूर्ण करावी व शहराच्या मध्यवर्ती भागात पुतळा उभारावा अशी आग्रही मागणी केली, यातूनच जयसिंगपूर नगरपरिषदेच्या माध्यमातून श्रीमंत जयसिंग महाराज उद्यानाच्या उजव्या बाजूस सांगली-कोल्हापूर रोडलगतच जयसिंगपूर बसस्थानका समोरची असणारी जागा निश्चित करुन या उद्यानात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा उभा करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती शिरोळचे आमदार राजेंद्र पाटील पड्रावकर व जयसिंगपूर नगरपरिषदेच्या प्रशासकीय अधिकारी तथा मुख्याधिकारी श्रीमती टीना गवळी यांनी यावेळी दिली.


आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर अधिक माहिती देताना म्हणाले, जयसिंगपूर नगरपरिषदेने निश्चित केलेल्या ठिकाणी सर्वांना विश्वासात घेऊन पुतळा उभा करण्याचे निश्चित केले आहे, लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांच्या नगरीत सर्व जाती धर्माचे लोक गुण्या गोविंदाने अनेक वर्षांपासून राहत आहेत शहराच्या मध्यभागातून जाणाऱ्या सांगली कोल्हापूर या राष्ट्रीय महामार्गावर एका बाजूला शिवतीर्थ तर दुसऱ्या बाजूला उभारण्यात येणारी भीमसृष्टी छत्रपती शिवाजी महाराज व विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर या महामानवांची ही स्मारके जयसिंगपूर शहराच्या सौंदर्यात भर टाकणारी ठरतील आणि ही बाब शहरवासीयां बरोबरच शिरोळ तालुक्यासाठी आनंदाची आणि अभिमानाची असेल असेही आमदार यड्रावकर यांनी यावेळी सांगितले, सि.स.न.1251 च्या न्यायालयाच्या ताब्यात असलेल्या जागेसाठी न्यायालयीन लढा भिमसैनिक मी स्वतः व जयसिंगपूर नगरपालिकेच्या माध्यमातून चालू ठेवला जाईल. न्यायालयाच्या माध्यमातून 1251 च्या जागेचा ताबा मिळताच त्या ठिकाणी म्युझियम व स्पर्धा परीक्षा केंद्र डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक म्हणून उभा करण्यात येईल असे सांगून आमदार यड्रावकर म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा श्रीमंत जयसिंग महाराज उद्यानात उजव्या बाजूस कोल्हापूर- सांगली रोड लगत जयसिंगपूर बसस्थानकामोर उभा करताना नॅशनल हायवे चे सर्व नियम पाळून आखीव रेखीव आणि सुंदर असा पुतळा उभा करण्यात येणार आहे या जागेत तळमजल्या मध्ये सुसज्ज ग्रंथालय स्टोअर तर पहिल्या मजल्यावर बुद्धिस्ट कल्चरचे डोम डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनातील महत्त्वाच्या घडामोडीचे शिल्प साकारण्यात येणार आहे, त्यामध्ये प्रामुख्याने संविधान सभा, चवदार तळे सत्याग्रह, माणगांव परिषद, काळाराम मंदिर सत्याग्रह असे महत्त्वाचे शिल्प या ठिकाणी उभारले जाणार आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अहोरात्र कष्ट घेवून संविधान लिहून देशाला अर्पण केले त्या संविधानाची प्रतिकृती बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या मागील बाजूस बसविली जाणार आहे. या ठिकाणी उत्कृष्ट सजावट तयार करून भीमसृष्टी उभा करण्यात येणार आहे. श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांना अभिप्रेत असलेले विचार डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवाने संविधानामध्ये प्रतिबिंबित केले आहेत. अशा या लोकराजा राजर्षी शाहू महाराजांच्या नगरीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा आणि भीमसृष्टी उभा करताना आत्यानंद होत आहे. घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा व भीमसृष्टीच्या माध्यमातून नव्या पिढीला ऊर्जा विचार आणि प्रेरणा मिळणार आहे, त्यामुळे सर्वांनी साथ द्यावी असे ही आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी यावेळी सांगितले.

Comments

Popular posts from this blog

अनैतिक प्रेम संबंधातून शिवथर येथील विवाहित महिलेचा गळा कापून खून.

गणेश टॉकीज जवळ बुलेट ने ठोकर दिल्याने एका महिलेचा मृत्यू.तर दोघेजण जखमी.

तुरंबे येथील तेरा वर्षाची युवती चे प्रेत विहिरी सापडले.