हातकणंगले पोलिसांची जुगार अड्ड्यावर मोठी कारवाई, सात जणांविरोधात गुन्हा दाखल.
हातकणंगले पोलिसांची जुगार अड्ड्यावर मोठी कारवाई, सात जणांविरोधात गुन्हा दाखल.
---------------------------------
कोल्हापूर प्रतिनिधी
संस्कार कुंभार
---------------------------------
हातकणंगले : हातकणंगले पोलिसांनी अतिग्रे येथील एका शेतात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा टाकून सात जणांना ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी या कारवाईत ३,५३,५५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, यामध्ये रोख रक्कम, जुगाराचे साहित्य आणि सात मोटारसायकलींचा समावेश आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १७ ऑगस्ट रोजी रात्री उशिरा अतिग्रे गावाच्या हद्दीत संजय आनंदा काकडे यांच्या शेतातील पत्र्याच्या शेडमध्ये जुगार सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार, पोलिसांनी तातडीने छापा टाकला. त्यावेळी काही लोक पैशांची बाजी लावून 'तीन पानी' पत्त्यांचा खेळ खेळताना आढळले.
पोलिसांनी घटनास्थळावरून संजय आनंदा काकडे (वय ३०), रामदास कृष्णा पाटील (वय ७६), रविंद्र भोपाल चोकाककर (वय ५३), शिवाजी माणिक दबडे (वय ४२), अशोक दत्तु चौगुले (वय ६०), किशोर बंडु बोरगावे (वय ४३) आणि कबीर सदाशिव सामंत (वय ४५) या सात जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून ३,५५० रुपये रोख रक्कम, जुगाराचे साहित्य आणि विविध कंपन्यांच्या सात मोटारसायकली असा एकूण ३,५३,५५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
याप्रकरणी हातकणंगले पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम १२(अ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक कांबळे करत आहेत.
Comments
Post a Comment