पणुत्रे येथे लोकमान्य तरुण मंडळाकडून रक्तदान शिबीर.

 पणुत्रे येथे लोकमान्य तरुण मंडळाकडून  रक्तदान शिबीर.

-------------------------------------       

कळे प्रतिनिधी 

साईश मोळे

-------------------------------------


कळे:- पन्हाळा तालुक्यातील पणुत्रे येथील लोकमान्य तरुण मंडळाकडून गणेशोत्सवानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

     या मंडळाची स्थापना १९९६ ला झाली असून अनेक वर्षांपासून कार्यरत असलेल्या या मंडळाकडून गणेशोत्सवानिमित्त दरवर्षी विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात.त्यामध्ये महाप्रसाद, महिलांच्या विविध स्पर्धा, धार्मिक कार्यक्रम राबविले जातात.

यावर्षी या मंडळामार्फत अर्पण ब्लड बॅंक कोल्हापूर यांच्या सहकार्याने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या रक्तदान शिबिरास मंडळाचे कार्यकर्ते, गावातील तसेच भागातील युवक,स्त्री,पुरुष यांनी मोठ्या प्रमाणात सहभागी होऊन रक्तदान केले.

विशेष म्हणजे या शिबिरामध्ये स्रीयांनी मोठ्या प्रमाणात भाग घेतला होता.याचे संयोजन शुभम मोरे  यांनी केले होते.रक्तदान शिबिरातुन लोकमान्य ग्रुप पणुत्रे यांनी सामाजिक बांधिलकी जोपासली आहे.यामध्ये एकुण ५१ रक्तदात्यांनी रक्तदान केले.यावेळी मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांनी नेटके नियोजन केले होते. दरवर्षी या मंडळामार्फत प्रा.डॉ.सरदार पाटील,शिक्षक डी.ए. पाटील. यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रम राबवले जातात.

कोल्हापूर विभाग.

Comments

Popular posts from this blog

गांधीनगरमध्ये दुकानदाराची ७.५१ लाखांची फसवणूक; दुकानातील कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल.

अनैतिक प्रेम संबंधातून शिवथर येथील विवाहित महिलेचा गळा कापून खून.

गणेश टॉकीज जवळ बुलेट ने ठोकर दिल्याने एका महिलेचा मृत्यू.तर दोघेजण जखमी.