अंकली पुलावरून महिलेने नदीत घेतली झेप; शोधकार्य सुरू.
अंकली पुलावरून महिलेने नदीत घेतली झेप; शोधकार्य सुरू.
---------------------------
शशिकांत कुंभार
---------------------------
कोल्हापूर : सांगली-कोल्हापूर मार्गावरील अंकली पुलावरून एका महिलेने नदीत झेप घेतल्याची घटना शनिवारी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास घडली.
महिलेचे नाव अनीता अरविंद हजारे असे असून मूळचे गाव कवठेमहांकाळ तालुक्यातील अग्रणी धुळगाव आहे. सध्या त्या कोल्हापूर जिल्ह्यातील उचगाव येथे वास्तव्यास होत्या.
मिळालेल्या माहितीनुसार, अनीता हजारे आपल्या पतीसोबत सांगलीहून कोल्हापूरकडे दुचाकीवरून जात होत्या. अंकली पुलाजवळ आल्यानंतर फोन आल्याने त्यांनी दुचाकी थांबवून मोबाईलवर बोलणे सुरू केले. यावेळी अचानक त्यांनी पुलावरून नदीत झेप घेतली. त्यांचे पती थांबवण्याचा प्रयत्न करत होते, परंतु ते निष्फळ ठरले.
घटनेनंतर स्थानिकांनी तातडीने मदतकार्य सुरू केले. वजीर रेस्क्यू फोर्स तसेच SRF पथकांनी नदीपात्रात शोधमोहीम सुरू केली असून अद्यापही शोधकार्य सुरूच आहे. घटनास्थळी मोठ्या प्रमाणावर नागरिकांची गर्दी झाली होती.
दरम्यान, पोलिसांनी पंचनामा करून चौकशी सुरू केली असून या घटनेमागचे नेमके कारण समजू शकलेले नाही.
Comments
Post a Comment