हुपरी येथील डॉ रोहन इंग्रोळे यांनी तयार केले सुईमुक्त लसीकरणाच जगातील पहिलं संशोधन.
हुपरी येथील डॉ रोहन इंग्रोळे यांनी तयार केले सुईमुक्त लसीकरणाच जगातील पहिलं संशोधन.
---------------------------
हुपरी. प्रतिनिधी
सचिन कुंभार
---------------------------
येथील डॉ रोहन इंग्रोळे या संशोधकांनी इंजेक्शनच्या सुईची भिंती संपवली आहे त्यांनी चक्क सुईमुक्त लसीकरणांच जगातील पहिल्या संशोधनाचा शोध लावला आहे आता मात्र यापुढे लसीकरणासाठी इंजेक्शनची गरजच पडणार नाही, असं संशोधन कोल्हापूर जिल्ह्यातील हुपरी येथील डॉ. रोहन इंग्रोळे यांनी अमेरिकेतील टेक्सास विद्यापीठात दात आणि हिरड्यांमधील रोगप्रतिकारक शक्तीचा वापर करून डेंटल फ्लॉसच्या आधारानं उंदरावर केलेलं संशोधन यशस्वी ठरलंय. "मर्यादित संसाधनं आणि कमीत कमी प्रशिक्षणासह हे संशोधन मानवी जीवनासाठी महत्त्वाचं ठरू शकतं," असा दावा संशोधक डॉ. रोहन इंग्रोळे यांनी केला आहे त्यांनी दातांच्या फ्लॉसनं लसीकरणाचं संशोधन केलं आहे. या लसीकरणाच्या संशोधनात निर्जंतुक केलेल्या विषाणूजन्य लेप दिलेल्या दाताच्या फ्लॉसनं उंदराचे दात स्वच्छ करुन हे संशोधन यशस्वी केलं आहे या पद्धतीनं लसीकरणाच्या प्रक्रियेत मोठी क्रांती घडवून आणली आहे..
No comments: