जाखले येथे बिबट्याने केली कुत्र्याची शिकार.
जाखले येथे बिबट्याने केली कुत्र्याची शिकार.
----------------------------------
अंबप प्रतिनिधी
किशोर जासूद
----------------------------------
जाखले (ता . पन्हाळा) येथील गावालगत असणाऱ्या हजारे गायकवाड मळ्यातील भागात बिबट्याने कुत्र्याची शिकार करून जवळच झाडावर लटकवल्याची घटना समोर आली आहे. या घटनेने स्थानिक नागरिकांमध्ये धाकधूक वाढली असून वन विभाग बिबट्याचा शोध घेत आहे.
स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार बहिरेवाडी गावाच्या दक्षिणेस जाखले येथील हजारे-गायकवाड मळा परिसरात सोमवारी रात्री एक बिबट्याने कुत्र्याची शिकार करून गायकवाड यांच्या घरापासून सुमारे दीडशे मीटर अंतरावर बांधावर असलेल्या झाडावर नेऊन लटकवलेले ही घटना मंगळवारी स्थानिक नागरिकांच्या निदर्शनास आले. याची माहिती वन विभागाला मिळताच. वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी धाव घेत वन्य प्राण्यांच्या कर्मचाऱ्यांसोबत मिळून परिस्थितीचा आढावा घेतला. वन विभागाने या परिसरात कॅमेरे लावण्यात आले असल्याची माहिती वनरक्षक योगेश पाटील यांनी स्पष्ट केले.
........
Comments
Post a Comment