कागल येथे अनंत रोटो गणेश मंदिरात श्रीकृष्ण जयंती सोहळा उत्साहात सुरू.
कागल येथे अनंत रोटो गणेश मंदिरात श्रीकृष्ण जयंती सोहळा उत्साहात सुरू.
-------------------------------------
कोल्हापूर प्रतिनिधी
सलीम शेख
-------------------------------------
कागल - येथील सिद्धिविनायक चॅरिटेबल ट्रस्ट आणि गणेशभक्त अनंत रोटो यांच्या संयुक्त विद्यमाने अनंत रोटो गणेश मंदिरात १५ आणि १६ ऑगस्ट रोजी श्रीकृष्ण जयंती सोहळा उत्साहात साजरा होत आहे. गोकुळाष्टमीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
या सोहळ्यामध्ये गोकुळाष्टमी, गोपाळकाला, वीणा उभारणे, प्रवचन, भजन, हरिपाठ, ग्रंथ वाचन आणि नामस्मरण यांसारख्या विविध कार्यक्रमांचा समावेश आहे. विशेषतः, श्रीकृष्ण जयंतीनिमित्त विणा पारायण सोहळा सुरू आहे, ज्यात अनेक वारकरी आणि भजनी मंडळी सहभागी झाली आहेत.
या धार्मिक कार्यक्रमांच्या नियोजनामध्ये सर्व ग्रामस्थ, युवक, तरुण मंडळी आणि वारकरी संप्रदायातील बंधू-भगिनींनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. सहभागासाठी इच्छुक व्यक्तींनी आपली नावे सुदाम पाटील आणि ह.भ.प. कुंडलिक हिरुगडे महाराज यांच्याकडे नोंदवावीत, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
यावेळी ह.भ.प. कुंडलिक हिरुगडे महाराज, माजी मुख्याध्यापक सदाशिव पाटील सर, सुदाम पाटील, नामदेव पाटील, गुरव भाऊ, महादेव जगदाळे, धनंजय पिष्टे, शिवगोंडा पाटील, रावसाहेब माने सरकार, प्रकाश हिरुगडे, सुतार भाऊ, माळी काका यांच्यासह अनेक गणेश भक्त, भजनी मंडळ आणि वारकरी संप्रदायातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments
Post a Comment