शिरोळ–कुरुंदवाड बार-परमिटवर खाजगी कर्मचाऱ्यांद्वारे ‘कलेक्शन’? — सचिन हटकरचे नाव चर्चेत, उत्पादन शुल्क निरीक्षकांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह.
शिरोळ–कुरुंदवाड बार-परमिटवर खाजगी कर्मचाऱ्यांद्वारे ‘कलेक्शन’? — सचिन हटकरचे नाव चर्चेत, उत्पादन शुल्क निरीक्षकांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह.
-----------------------------------
जयसिंगपूर/प्रतिनिधी
नामदेव भोसले
-----------------------------------
राज्य उत्पादन शुल्क इचलकरंजी दुय्यम निरीक्षक कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील शिरोळ व कुरुंदवाड विभागात बार व परमिट धारकांकडून दरमहा मोठ्या प्रमाणात ‘कलेक्शन’ होत असल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. या कथित कलेक्शनमध्ये खाजगी कर्मचारी सचिन हटकर याचे नाव पुढे आले असून, तो संबंधित दुय्यम निरीक्षकांच्या छत्रछायेखाली कार्य करतो, अशी स्थानिक सूत्रांची माहिती आहे. यामुळे राज्य उत्पादन शुल्क निरीक्षकांचा यात नेमका किती सहभाग आहे, यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे शिरोळ व कुरुंदवाड भागातील बार व परमिट धारकांकडून दरमहा ठराविक रक्कम मागितली जाते.ही वसुली थेट अधिकाऱ्यांकडे न होता खाजगी कर्मचारी सचिन हटकर याच्या माध्यमातून केली जाते.
मोबदला मिळाल्यास संबंधित हॉटेल/बारवर छापे, कारवाई किंवा कठोर तपास टाळला जातो, अशी चर्चा आहे.
दुय्यम निरीक्षकांकडे तपास, परवाना नियंत्रण, दंड आकारणी व गोपनीय अहवाल तयार करण्याची जबाबदारी असते.
खाजगी कर्मचारी सचिन हटकर वसुली करतोय, याला त्यांची मौनमान्यता नसेल तर ते शक्य नाही, असा नागरिकांचा प्रश्न आहे.त्यामुळे संबंधित निरीक्षक व उच्च पातळीवरील उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांचा यात अप्रत्यक्ष सहभाग असल्याचा संशय व्यक्त होत आहे .शासन कार्यालयातील महसूल व तपासाशी संबंधित कामात खाजगी व्यक्तींचा हस्तक्षेप बेकायदेशीर आहे.
‘कलेक्शन’ व लाचलुचपत हे प्रतिबंधक भ्रष्टाचार कायदा, 1988 अंतर्गत गुन्हा दाखल करुन ते
दोषी आढळल्यास अधिकाऱ्यांवर विभागीय चौकशी, निलंबन करावे असे स्थानिक व्यापारी संघटना व सामाजिक संस्थांनी या प्रकरणावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
“गोपनीय तपासाच्या कार्यालयात खाजगी कर्मचारी सचिन हटकर मोकाटपणे कलेक्शन करत असेल, तर त्यामागे अधिकाऱ्यांची थेट मान्यता आहे असे मानावे लागेल. यावर उच्चस्तरीय चौकशी हवीच,” अशी मागणी त्यांनी केली.
या प्रकरणात तात्काळ चौकशी करून —खाजगी कर्मचारी सचिन हटकरला कलेक्शनची मुभा कोणी दिली?शिरोळ व कुरुंदवाड विभागातील दुय्यम निरीक्षकांचा नेमका सहभाग काय?मिळालेल्या रकमेचे वाटप कोणाकडे व कसे होते?हे स्पष्ट करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
Comments
Post a Comment