कोल्हापूर जिल्ह्याचे डी.एस.पी योगेश कुमार गुप्ता यांच्या अंतर्गत राजाराम पोलीस ठाणे हद्दीतील गणेश मंडळांची बैठक.

 कोल्हापूर जिल्ह्याचे डी.एस.पी योगेश कुमार गुप्ता यांच्या अंतर्गत राजाराम पोलीस ठाणे हद्दीतील गणेश मंडळांची बैठक.

-------------------------------

कोल्हापूर प्रतिनिधी

 संस्कार कुंभार 

-------------------------------

कोल्हापूर, दि. २१ ऑगस्ट: कोल्हापूर जिल्ह्यातील राजारामपुरी पोलीस स्थानकातर्फे आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीत मागील वर्षीच्या गणेशोत्सवातील मुख्य मिरवणुकीच्या लकी ड्रॉचे आयोजन करण्यात आले होते. तसेच, यंदाच्या गणेशोत्सवाच्या नियोजनाबाबत महत्त्वाची चर्चा झाली.

या बैठकीला कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक (डी.एस.पी) योगेश कुमार गुप्ता, अतिरिक्त पोलीस अधीक्षक धीरज कुमार आणि राजारामपुरी पोलीस ठाण्याचे प्रभारी सुशांत चव्हाण यांच्यासह अन्य पोलीस कर्मचारी उपस्थित होते. राजारामपुरीतील विविध गणेश मंडळांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने या बैठकीत सहभागी झाले होते.

डीएसपी गुप्ता यांनी सर्व मंडळांना मार्गदर्शन करताना शांतता आणि सुव्यवस्था राखण्याचे आवाहन केले. त्यांनी मंडळांच्या कार्यकर्त्यांना नियमांचे पालन करण्याचे आणि उत्सवादरम्यान कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार होणार नाही याची काळजी घेण्याचे आवाहन केले.

या बैठकीत मागील वर्षीच्या गणेशोत्सवादरम्यान काढण्यात आलेल्या मुख्य मिरवणुकीचा लकी ड्रॉ काढण्यात आला. यामुळे यंदाच्या मिरवणुकीच्या नियोजनाला दिशा मिळाली आहे. पुढील गणेशोत्सवासाठी सुरक्षा आणि इतर व्यवस्थांबाबतही सूचना देण्यात आल्या. या बैठकीमुळे पोलीस प्रशासन आणि गणेश मंडळांमध्ये समन्वय साधला गेला, ज्यामुळे उत्सव शांततेत आणि उत्साहात पार पडण्यास मदत होईल.

Comments

Popular posts from this blog

गांधीनगरमध्ये दुकानदाराची ७.५१ लाखांची फसवणूक; दुकानातील कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल.

अनैतिक प्रेम संबंधातून शिवथर येथील विवाहित महिलेचा गळा कापून खून.

गणेश टॉकीज जवळ बुलेट ने ठोकर दिल्याने एका महिलेचा मृत्यू.तर दोघेजण जखमी.